आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - सोलापूर विज्ञान केंद्राच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ‘संवाद वैज्ञानिकांशी’ हा उपक्रम आयोजिला आहे. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक, भारतीय उपगृहांच्या निर्मितीचे शिलेदार इस्रोचे निवृत्त समूह संचालक डॉ. सुरेश नाईक यांच्या दोन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. 13 व 14 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम होणार असून डॉ. नाईक हे अवकाश तंत्रज्ञान, चांद्रयान, मंगळयान या विषयांवर संवाद साधणार आहेत.
रंगभवन, विज्ञान केंद्रात व्याख्यान : रंगभवन येथील शिवछत्रपती सभागृहात 13 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता पहिले व्याख्यान होईल. विज्ञान केंद्र व दयानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या या उपक्रमात विज्ञान व अभियांत्रिकी विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे डॉ. नाईक विषय उलगडणार आहेत.
राष्ट्रीय विज्ञान व प्रद्योगिकी संचार परिषद, डीएसटी आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, राज्य शासन पुरस्कृत विज्ञान केंद्रातर्फे डॉ. नाईक यांचे द्वितीय व्याख्यान 14 फेब्रुवारीला सकाळी 9.15 वाजता सोलापूर विज्ञान केंद्रातील सभागृहात आयोजिले आहे. या वेळी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार अध्यक्षस्थानी असतील. पांडुरंग कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक के. एन. निबे प्रमुख पाहुणे असतील.
चांद्रयान, मंगळयानाचा विषय
भारतीय उपगृहनिर्मितीच्या प्राथमिक अवस्थेपासून उच्च् दर्जाच्या विकासाचे उध्वर्यू म्हणून डॉ. नाईक यांचे मोठे योगदान आहे. ते सध्या इंटरनॅशनल स्पेस सोसायटीचे विद्यमान चेअरमन आहेत. वैज्ञानिकांच्या कार्याची माहिती मिळावी आणि त्यांच्या अनुभवातून काही तरी शिकता यावे याकरिता हा उपक्रम आयोजिला आहे. ‘चांद्रयान, मंगळयान, क्रायोजेनिक इंजिन, अवकाश तंत्रज्ञान - भारताचे स्थान आणि विद्यार्थ्यांना संधी’ हा दोन दिवस चालणार्या व्याख्यानाचा विषय असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.