आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Search Talent, Sushilkumar Shinde Give Advise To Drama Artist

रंगभूमीवरील नव्या टॅलेंटचा शोध घ्या.! , सुशीलकुमार शिंदे यांचा रंगकर्मींना सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शं. ना. नवरे नाट्यनगरी - मराठी रंगभूमीवरील नवीन टॅलेंटचा शोध घेऊन उद्याच्या रंगभूमीवरील नव्या उमेदीची तरुण पिढी घडवण्याचा सल्ला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रंगकर्मींना शनिवारी येथे दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 94 व्या संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
मावळते अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांनी नूतन अध्यक्ष अरुण काकडे यांच्याकडे सूत्रे सुपूर्द केली. त्यानंतर बारामती येथे झालेल्या 93 व्या नाट्यसंमेलनाच्या संयोजकांनी आणलेल्या ज्योतीने दीपप्रज्वलन करण्यात आले.
रंगकर्मींनी हलकीफुलकी नाटके करावीत; पण ते नाटकाचे अंतिम ध्येय असू नये. ही मराठी नाटकांची परंपराही नाही. प्रेक्षकांच्या हजारो ओंजळीत भरून उरेल एवढे संस्कृती व संस्कारांचे सोने नाटकाने लुटले पाहिजे; पण हा चमत्कार एका रात्रीत होणारा नाही. त्यासाठी नवीन टॅलेंट, प्रतिभाशाली रंगकर्मींचा शोध घ्यावा लागेल, असे शिंदे या वेळी म्हणाले.
संवेदना कायम
समन्वय, संघटन, संवेदनेने महाराष्ट्र आणि त्याच्या बाहेरील कलावंतांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या आहेत. त्रुटी असल्या तरी संवेदना कायम आहेत. दीपक करंजीकर, प्रमुख कार्यवाह, नाट्य परिषद
वरातीचे स्वरूप नको
नाट्यदिंडी काढली; परंतु त्याला वरातीचे स्वरूप होते. कुठल्याही दिंडीत त्याची प्रतीके असतात. परंतु ती या दिंडीत दिसून आली नाहीत. डॉ. मोहन आगाशे, संमेलनाचे मावळते अध्यक्ष
पहिल्यांदा अभिनेता
राजकारणी पहिल्यांदा अभिनेता असतो. नंतर तो नेता होतो. सुशीलकुमार शिंदे हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत. त्यामुळे दोघांत फरक करता कामा नये. आमदार भारत भालके, स्वागताध्यक्ष