आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Searching Hope : Orphan Children Life Happy With Pernar Pakhar Complex

शोध आशेचा : अनाथ मुलांच्या जीवनात आनंद आणि संस्कार पेरणारा पाखर संकुल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - प्रत्येक लहान मुलाला वाटत असते की आई-बाबांनी आपल्याला फिरायला न्यावे, खूप मजा करावी. परंतु काही चिमुकल्यांच्या डोळ्यांतली ही स्वप्ने अधुरीच राहतात. दत्त चौकातील पाखर संकुल बालसंगोपन योजनेअंतर्गत अनाथ चिमुकल्यांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचे काम करत आहे. शंकरबाबा महाराज पुण्यतिथीनिमित्त 15 एप्रिल ते 2 मे या कालावधीत शुभराय मठात उन्मेष प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासोबतच संस्कारांचे सिंचन करणारा हा प्रकल्प आहे.


कोण आहेत ही मुले? : दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांमधील ज्या मुलांना वडील किं वा आई नाही अथवा कु णीच नाही अशा मुलांना बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून शासन अर्थसहाय्य करते. यातील ‘विद्यादायिनी’ योजनेतील मुलांना समाजातील दानशूर व्यक्ती व सेंट्रल बॅंक अर्थसहाय्य करते.


येथे होतात शुभ संस्कार : मुलांना नुसते अर्थसहाय्य करून त्यांची गरज भागणार नाही. त्यांच्यावर उत्तम संस्कार व्हावेत यासाठी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी र्शी शुभसंस्कार वर्ग घेण्यात येतात. यामध्ये मुलांना विविध कला, खेळ, श्लोक पाठांतर शिकवले जाते. अभ्यास व वाचनासाठी वाचनालयही आहे. वर्षभरातील सण, उत्सवाचे महत्त्व सांगून ते मुलांसमवेत साजरे केले जातात.


उन्हाळ्यात खास मेजवानी : साधारण उन्हाळी परीक्षा झाल्या की मुले अजोळी जातात. परंतु या मुलांचे आजोळही पाखरच अन् मामाचे गावही पाखरच. या आजोळी मुलांना बौद्धिक, शारीरिक, वैचारिक खाद्य दिले जाते. यात रंगकाम, बँकेचे व्यवहार, सहल, पारंपरिक वेशभूषा दिन, रांगोळी, मेंदीचे शिबिर, मडके रंगवण्याचे काम, कापडावरील पेंटींग, बांबू काम, दागिने बनवण्याचे काम असे अनेकविध प्रकार शिकवले जातात.

ज्यांचे कोणीच नसतो त्यांचा देव असतो, या उक्तीनुसार हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यातून आम्हीही आनंद लुटतो. या कामाचे खूप समाधान वाटते.’’ शुभांगी बुवा, संचालिका, पाखर संकुल