आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Self Experience Bhimbai Siddhaganesh Of Diksha Bhumi With Babasaheb Ambedkar

दीक्षा घेतली अन् माझे जीवन सार्थक झाले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेणार असल्याची बातमी कळाली होती. आम्ही 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी रेल्वेने नागपूर येथे पोहोचलो. दीक्षाभूमीवर जनसागर उसळला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पमरशांती, चंदगिरी, शांताबाई आणि खोब्रागडे व्यासपीठावर होते. बाबासाहेबांना दीक्षा घेताना पाहून अंत:करण भरून आले अन् जीवन सार्थक झाले, या शब्दांत 98 वर्षीय भीमबाई सिद्धगणेश यांनी आठवण जागवली.

भीमबाई आणि त्यांचे पती दोघांनी त्यावेळी दीक्षा घेतली. दीक्षा घेतेवेळी पांढरे कपडे विकत घेतले. अंगावरचे सर्व दागिने काढून ठेवले. आमच्या जीवनातील तो क्षण अविस्मरणीय होता. घरात आधीपासून समता सैनिक दलाचे वारे होतेच. त्यामुळे दीक्षा घेताना ऊर भरून आला. दागदागिने त्यागले. घरातील देव देव्हारा काढून ठेवला. आजतागायत अंगावर पांढरं पातळ घातले आहे. बाबासाहेबांच्या ज्ञानाची सावली आमच्यावरही पडली आहे. बाबासाहेबाच्या विचारस्पर्शाने जीवन उजळून निघाले.

प्रेरणादायी भाषण
14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षा भूमीवर बाबासाहेबांनी केलेले भाषण तमाम बौद्धबांधवांसाठी प्रेरणादायी ठरले. अपृश्यता नष्ट करून मानाचे जीवन जगता यावे, यासाठी सदैव प्रयत्न करत राहा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश त्यांनी दिला.

स्वयंसेवक म्हणून आयुष्यभर कार्य केले
दीक्षा घेऊन आल्यानंतर सोलापुरात स्वयंसवेक बनून आम्ही कार्य केले. बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी रात्रंदिवस झटत राहिले. त्यांच्या कार्यात आपले आयुष्य गेले तरी चालेल, अशी भावना ठेवून सदैव कार्य करत राहिले. हेच व्रत ठेवले.