आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Self made Helicopter Issue At Solapur, Divya Marathi

स्वनिर्मित हेलिकॉप्टर उडवण्यासाठी सुरू आहे सोलापूरच्या प्रांजलचा संघर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लहानपणापासूनच विमानाचे जबरदस्त आकर्षण असणार्‍या सोलापूरच्या प्रांजलने हेलिकॉफ्टर बनवलं. पण तांत्रिक नियमांच्या कचाट्यातून त्याचे स्वप्न अधांतरीच राहिले. यामुळे हताश झालेल्या या हौशी तरुणाने स्वनिर्मित हेलिकॉफ्टर नष्ट करून टाकले. त्याने स्वप्न विसरायचा प्रयत्न केला पण त्याला ते शक्य झाले नाही. आता तो पुन्हा एकदा साहित्याची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्याच्या संघर्षावर ही चित्तरकथा.

बी.एस्सी. पर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रांजलचे तसे एरोमॉडेलिंग किंवा पायलटचे म्हणावे तसे शिक्षण झालेले नाही. मात्र बालपणापासूनच त्याला विमानाचे वेड होते. हरिभाई देवकरणमध्ये शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर प्रांजल पुढील शिक्षणासाठी पुण्यात पोहोचला. गरवारे महाविद्यालयातून त्याने बी.एससी.चे शिक्षण घेऊ लागला. त्याचवेळी तो एनसीसीच्या एअरविंगमध्ये दाखल झाला. नंतर तो राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) एरोमॉडेंलिग प्रशिक्षक म्हणून काम करू लागला. नंतर तो मायक्रोलाइट 2 आसनी विमाने उडवू लागला. विमान चालवण्याचे अनुभव त्याला विमानाच्या अधिक जवळ घेऊन गेले. इतके जवळ की त्याने स्वत:च हेलिकॉफ्टर बनवण्याचे स्वप्न पाहू लागला.

हाती पुरेसा पैसा नाही, मात्र आपल्या प्रतिभेच्या बळावर त्याने हेलिकॉफ्टर बनवण्याचे काम सुरू केले. दोन महिन्यांच्या अथक पर्शिमानंतर त्याने अजिंक्य नावाचे भारतीय बनावटीच हेलीकॉफ्टर बनवले. लांबीला 11 फूट आणि 11 फुटाचा वरचा पंखा बसवला. 10 लिटरची पेट्रोलटाकी. स्टेनलेस स्टिल, फायबर, अँल्युमिनियम, लाकूड याचा वापर करून त्याने हेलिकॉफ्टर बनवले. हेलिकॉफ्टर बनवले आणि त्याच्यासमोर अनेक अडचणी दत्त म्हणून उभ्या राहिल्या. त्या अडचणींनी तो खचून गेला. हतबल ठरला आणि स्वनिर्मित हेलिकॉफ्टर स्वत:च नष्ट केला. पण त्याचे ते स्वप्न त्याला झोपू देईना. जीवनाचे एकच ध्येय - हेलिकॉफ्टरची निर्मिती करणे. आता तो पुन्हा कामाला लागला आहे. आवश्यक त्या साहित्यांचे जुळवाजुळव करत आहे. तो म्हणतो, ‘पंखो से कुछ नही होता, हौसलो से उडाण होती है.’ स्पेशल एअरक्राफ्टचे रोटॅक्स इंजिन स्वनिर्मित विमानास बसवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. हे इंजिन केवळ ऑस्ट्रीया, अमेरिका येथेच मिळते.
काय आल्या अडचणी
हेलिकॉफ्टर उडवण्यासाठी नागरी उड्डाण महासंचालकाची परवानगी मिळाली नाही. नॅशनल एअरक्रॉफ्टमध्ये नोंदणी झाली नाही. तात्पुरत्या स्वरुपाचे विमान उडवण्यासाठी हेलिकॉफ्टरमधील 80 टक्के साहित्य चांगल्या दर्जाचे असणे गरजचे असते. प्रांजलने स्वत: तयार केलेले साहित्य वापरले होते. हेलिकॉप्टरचे इंजिनदेखील चारचाकी वाहनाचे होते. आता त्याने चांगल्या दर्जाच्या साहित्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. पाच लाखांचा खर्च अपेक्षित आहे.