आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"सेल्फी'चा क्षण :हिरवाईने नटलेल्या कॅम्पसमध्ये अनुभवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारचादिवस उजाडला तो वेगळाच. डिसेंबरमध्ये पावसाळ्याचा अनुभव केव्हाच आलेला नव्हता. त्यामुळे कॉलेजला जाताना छत्री, रेनकोट घेऊन जावे की स्वेटर घालून जावे, अशा संभ्रमात असणारी तरुणाई. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटमधील कॅम्पसही याला अपवाद नव्हते. एमबीए, बीबीए आणि बीसीएस मधील विद्यार्थी थोड्या फनी मूडमध्ये असलेली दिसून आली. विद्यार्थ्यांचा एक उत्साही ग्रुप सेल्फीमध्ये मग्न होता. सेल्फी म्हणजे आपले स्वत:चेच छायाचित्र आपल्याच मोबाइलमध्ये टिपणे. अर्थात एवढा साधा अर्थ नसतो याला. या आनंदात सहभागी प्रत्येकाला तेवढाच आनंद झालेला असला पाहिजे. असे एक सूत्रही त्याला पाहिजे.
मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटमध्ये गर्द हिरवाईने नटलेल्या कॅम्पस प्रांगणात उत्साही मूड उधाणलेला होता. थोडा ब्रेक मिळालेला होता. लायब्ररीत डोकावून झाले होते. कॅण्टीनमध्ये वाफाळत्या चहासोबत भरपेट गप्पा झाल्या होत्या. तेवढ्यात एकाला सुचले, चला सेल्फी काढूयात. मग सुरू झाले फोटो सेशन. अख्खा ग्रुपच्या सेल्फी सहा इंची कॅमेऱ्यात सामावला.

सेल्फी काढून आपल्या मोबाइलमध्ये साठवणे, फुरसतीच्या क्षणी तो आनंदी क्षण पुन्हा आठवणे, हे तर तरुणाईचे वैशिष्ट्य बनले आहे. केवळ हसऱ्या चेहऱ्यांचा सेल्फी काढतात असे नाही. फनी सेल्फी काढले जातात. म्हणजे फोटो काढताना ग्रुपमधल्या सगळ्यांनी फनी चेहरा करायचा. तसाच शॉकिंग सेल्फीही काढतात. म्हणजे सर्वांचे चेहरे आश्चर्यचकित, जणू शॉक बसलेला करायचा आणि सेल्फी काढायचा. आहे न् भन्नाट आयडिया. चला तर मग व्हा तयार, कॅम्पस सेल्फीसाठी. अनुभवा असाही भन्नाट क्षण.