सोलापूर- हवेतीलगप्पा मारणारा मी नेता नाही, दूरदृष्टी ठेवून प्रत्येक गोष्टीचा बारकाईन अभ्यास करून मी बोलतो. महाराष्ट्राच्या विविध भागांच्या विकासासाठी शिवसेनेने व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. या अंतर्गत सोलापूरला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न असून शहराला टेक्सटाइल हब बनवण्याचे नियोजन केले आहे. याकरिता सोलापुरातील नागरिकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून दिले पाहिजे. तेव्हाच शिवसेनेचे स्वप्न प्रत्यक्षात येणार असल्याचे शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
संगमेश्वर महाविद्यालयाजवळील स्काउट गाइड मैदानावर सोमवारी झालेल्या जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. ठाकरे यांच्या झंझावती सोलापूर दौऱ्यांचा शेवट सोलापुरातील सभेने झाला. युती तुटल्यानंतर ठाकरे यांची ही पहिलीच सभा होती.
आपल्या पंधरा-वीस मिनिटांच्या भाषणात ठाकरे यांनी टीका टाळून विकासाच्या मुद्दयावर भर दिला. सोलापूरच्या विकासासाठी शहरातील यंत्रमागधारकांसाठी टेक्स्टाइल हब होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पार्किंगची व्यवस्था ढासळली : सभेसाठीयेणाऱ्या चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था होम मैदानावर करण्यात आली होती. मात्र, दुचाकी वाहनांची व्यवस्था सभेच्या ठिकाणी करण्यात आल्याने वाहनधारक या परिसरात जागा मिळेल तेथे वाहने लावत होते. सभा संपल्यानंतर दुचाकी काढण्यासाठी कार्यकर्त्यांना कसरत करावी लागली.
अन् मैदान झाले स्वच्छ : संगमेश्वरमहाविद्यालयाजवळील स्काऊट गाइड कार्यालयाशेजारच्या खुल्या मैदानात प्रथमच जाहीर सभा झाली. या मैदानात यापूर्वी काटेरी झुडपे होती. सोमवारी शिवसेनेच्या सभेमुळे हे मैदान स्वच्छ करण्यात आले. ज्या मैदानाकडे अनेक वर्षांपासून कोणी पाहिलेसुध्दा नव्हते ते शिवसेनेमुळे स्वच्छ झाले.
यांची होती प्रमुख उपस्थिती
ठाकरेयांच्या सभेप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर, सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहर प्रमुख प्रताप चव्हाण, शहर उत्तरचे उमेदवार उत्तमप्रकाश खंदारे, मध्यचे महेश कोठे, दक्षिणचे गणेश वानकर, मोहोळचे मनोज पवार,महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणावरठाकरे यांचे व्हिजन
शहरातीलप्रत्येक महाविद्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब शिवसेनेच्या सभेप्रसंगी पुरुषोत्तम बरडे, विश्वनाथ नेरुरकर, मनोज पवार, गणेश वानकर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रमोद गायकवाड, महेश कोठे, उत्तमप्रकाश खंदारे, लक्ष्मीकांत ठोंगे‑पाटील.
नारायणराणेंवर बोला ...
उद्धवठाकरे यांचे भाषण सुरू होते तेव्हा एक कार्यकर्ता मधेच उठून म्हणाला, राणेंवर बोला. त्यावर ठाकरे यांनी मी फालतू लोकांवर बोलून आपला वेळ वाया घालवत नाही, असे सांगितले. असे प्रकार सभेत सुरू होते. ठाकरे यांची सभा सुरू होण्यापूर्वी मनोरंजन करणाऱ्या कलावंताने अश्लील शब्दा िवनोद केले. या विनोदालाही उपस्थितांतून टाळ्या मिळत होत्या.