आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिक आपत्तींमुळे लांबला पाहुण्या पक्ष्यांचा दौरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापुरातीलपाणवठे हे स्थानिक स्थलांतरित पक्षांचे माहेर घर आहे, अशी उपाधी ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी दिली होती. दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच मूळ अधिवासातून स्थलांतरित होणाऱ्या पाहुण्यांचे सोलापुरात (माहेरी) आगमन होण्यास सुरुवात होते. यंदाच्या वर्षी गारपीट, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना पाहुण्यांना करावा लागल्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिना उजाडून थंडीची सुरुवात तरी जिल्ह्यातील पाणवठ्यांवर मात्र स्थलांतरित पक्ष्यांचा फारसा वावर नसल्याचे चित्र आहे.
यंदाच्यावर्षी सुरुवातीलाच अवकाळी पाऊस गारपिटीचा मोठा तडाखा बसला. वातावरणात होणाऱ्या बदलांचा पक्ष्यांना सर्वप्रथम अंदाज येतो. सायबेरियातील सर्व भूभाग बर्फाने अच्छादित होऊ लागल्यावर पक्षी त्यांच्या प्रवर्गानुसार स्थलांतरास सुरुवात करतात. काही पक्षी हजारोंच्या संख्येने स्थलांतर करून सोलापुरात येतात. पण, पक्ष्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू होताच हुदहुद गुजरातमध्ये आलेले निलोफर चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे पक्ष्यांचे स्थलांतर लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यंदाही पक्षी येतील
स्थलांतरितकरत असलेल्या पक्ष्यांना वाऱ्याची दिशा, लहरी यांचे ज्ञान असते. तसेच, काही पक्षी तर थेट हिमालयातून येतात. त्यांना हिमवादळाचा अनुभव असतो. त्यामुळे केवळ एका वादळामुळे फारसा फरक पडेल असे वाटत नाही. उजनी धरणावर काही पक्षी आले असून, इतर पक्षीही त्यांच्या वेळेत सोलापूरकरांच्या पाहुणचारासाठी येतील, असा माझा विश्वास आहे. डॉ.अरविंद कुंभार, पक्षीमित्र