आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Separate Good Shed Issue At Solapur, News In Marathi

आता गुड शेड होणार वेळोवेळी स्वच्छ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे गुड शेड (मालधक्का) मध्ये सिमेंट आणि तांदूळ एकाच ठिकाणी उतरवले जात असल्यामुळे रेशनिंग दुकानात सिमेंट मिर्शित तांदूळ मिळत होता. याची उशिरा दखल घेत रेल्वे प्रशासनाने मालधक्का स्वच्छ ठेवण्याचा मक्ता दिला आहे.

मालधक्क्यावर व्हीलचे 48 दरवाजे असतात. यामधून सिमेंट आणि तांदूळ आणून मालधक्क्यावर ठेवला जातो. सिमेंट आणि तांदूळ ठेवण्याचे नियोजन नाही आणि त्याची स्वच्छता वेळेवर होत नाही यामुळे तांदळामध्ये सिमेंटचे मिर्शण होत होते. उशिरा का होईना याची दखल घेत मालधक्का स्वच्छ ठेवण्याचा मक्ता काढला आहे. हा मक्ता दहा दिवसांचा असून, यानंतर जास्त कालावधीचा मक्ता देण्यात येणार आहे. यामुळे इथून पुढे मालधक्का स्वच्छ दिसणार हे नक्की.
दहा दिवसांचा मक्ता काढण्यात आला आहे. यानंतर कामाचा दर्जा पाहून मक्त्याचा कालावधी वाढवला जाईल. भास्करराव, साहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक