आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Separate Ticket Counter At Small Railway Station

लहान स्थानकांवर स्वतंत्र तिकीट विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- भारतील रेल्वेने ‘इ’ दर्जाच्या स्थानक व्यवस्थापकांना गाड्यांच्या नियोजनासह तिकीट विक्री करण्याचे काम देखील पाहावे लागत होते. आता कामात बदल करण्यात आला असून फक्त गाड्यांचे नियोजन राहणार आहे. तिकीट विक्रीसाठी स्वतंत्र सोय असणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी भारतीय रेल्वे बोर्डाने भारतातील सर्व झोनला या संबंधीचा आदेश दिला आहे. भारतीय रेल्वेचा हा पायलट प्रोजेक्ट आहे. सोलापूर विभागासही या संबंधीचा आदेश प्राप्त झाला आहे. त्यानुसार सोलापूर विभागही कामाला लागला आहे.

काय आहे योजना?
स्थानक व्यवस्थापकांचे काम हलके करण्यासाठी ही योजना अमलात आणली जाणार आहे. रेल्वे विभागांच्या वतीने निविदा प्रसिद्ध करून स्थानिक व्यक्तीला तिकीट स्टेशन बुकिंग सेवक म्हणून काम देण्यात येईल. अन्य ठिकाणची व्यक्ती यास पात्र नाही. बुकिंग सेवक म्हणून काम करणारी व्यक्ती केवळ चालू तिकीट विकण्यासाठी स्थानकावर काम करत राहील.

विभागातील 54 स्थानकांना फायदा
सोलापूर रेल्वे विभागात एकूण 104 रेल्वे स्थानके आहेत. पैकी 54 इ दर्जाचे आहेत. यात पाकणी, अनगर, वाकाव, बाळे, टिकेकरवाडी, मुंढेवाडी अशा स्थानकांचा समावेश असणार आहे. स्टेशन बुकिंग सेवक हा त्याच गावातील असल्यामुळे गावांत रोजगारदेखील वाढणार आहे.

काय आहेत याच्या अटी?
तिकीट सेवक म्हणून काम करणारी व्यक्ती किमान दहावी पास असली पाहिजे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंद असला न पाहिजे. त्याचे प्रमाणपत्र संबंधित पोलिस ठाण्यामधून देणे बंधनकारक आहे. दर महिन्याला त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

लवकरच निविदा
‘ई’ दर्जाच्या स्थानक व्यवस्थापकांचे काम हलके व्हावे. त्यांनी गाड्यांचे ऑपरेटिंगचेच काम करावे या हेतूने तिकीट स्टेशन बुकिंग सेवक ही योजना राबविण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतील सोलापूर तसेच अन्य विभागात या संदर्भात लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येतील. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली याचे काम चालेल.’’ एम. ए. कांबळे, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई