आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवाभावी वृत्तीचा झाला सन्मान - मधुभाई कुलकर्णी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सेवाभावी वृत्ती सर्वांत महत्त्वाची मानली पाहिजे, कार्याचे क्षेत्र कोणतेही असो. कोणत्याही माध्यमातून सेवा करता येते. धर्माची सेवा म्हणजे त्याग मानावा तर आध्यात्मिक साधनेतील पहिली पायरी सेवा मानली पाहिजे. या कसोटीत उतरणा-या सन्माननीयांना जनकल्याण समितीने गौरवले, एका अर्थाने हा पुरस्काराचा तसेच सेवाभावी वृत्तीचा सन्मान आहे, असे प्रतिपादन राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य मधुभाई कुलकर्णी यांनी केले.

राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने देण्यात येणा-या प. पू. गुरुजी पुरस्काराचे वितरण रविवारी शिवस्मारक सभागृह येथे पार पडले. या वेळी कुलकर्णी बोलत होते. 51 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प. पू. मा. स. गोळवलकर तथा श्रीगुरुजी पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. या वर्षी स्वामी विवेकानंद सार्ध शती असून
प. पू. श्रीगुरुजी हे त्यांच्या परंपरेतील अनुग्रहित होते, सोलापुरातील पुरस्कार वितरणाने हाही योगायोग यानिमित्त साधला गेला. या वेळी विश्वसंस्कृत प्रतिष्ठानचे महामंत्री गुलाम दस्तगीर, पुरस्कार प्रदान सोहळा समितीचे अध्यक्ष पूर्णचंद्र राव, सचिव अरुण दाते, रा.स्व. संघ जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, जिल्हा संघचालक दामोदर दरगड यांची प्रमुख उपस्थिती होती.

धर्मसंस्कृती, अनुसंधान, कलाक्षेत्राचा सन्मान
धर्मसंस्कृती क्षेत्रात अलौलिक कार्य करणारे स्वामी गोविंददेव गिरी (आचार्य किशोरजी व्यास) यांना धर्मसंस्कृती
पुरस्कार, वैद्यकीय क्षेत्रात संशोधनावर गेली 40 वर्षे कार्य करणारे डॉ. हिंमतराव बावस्कर (महाड) यांना अनुसंधान
पुरस्कार, संगीत क्षेत्रात 40 वर्षांपासून कार्यरत चंद्रकांत नाईक (पुणे) यांना कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, मधुभाई कुलकर्णी, गुलाम दस्तगीर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.