आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना मिळणार हक्काचे सुविधा केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन कक्ष होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना कोणते कार्यालय कोठे आहे? अमूक-अमूक अर्ज कोठे द्यायचा?, अमूक माहिती कोठून मिळणार? याची अचूक माहिती देण्यासाठी सुविधा केंद्र सुरू करण्यात येत आहे. हे कार्यालय येत्या आठवडाभरात नागरिकांच्या सेवेत येणार आहे. विशेष म्हणजे नागरिकांना अचूक माहिती देण्यासाठी स्वतंत्र नायब तहसीलदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या कल्पनेतून हे कार्यालय होणार आहे. जिल्हाधिकारी बहुद्देशीय सभागृहाच्या समोरील बाजूस नवीन कार्यालयाचे काम सुरू आहे. एखादा अर्ज द्यायचा असेल, एखादी माहिती हवी असले वा एखाद्या अधिकाऱ्यास भेटायचे असलेल्या नागरिकास पायऱ्या चढून थेट वर जावे लागत. शिवाय, वर आलेल्या अधिकाऱ्यांना अचूक माहिती मिळाल्याने त्याला चार कार्यालय फिरावे लागत होते. नागरिकांची हा त्रास कमी करण्यासाठी सुविधा केंद्र तयार करण्यात येत आहे.
सुविधा केंद्राबरोबरच जिल्हा नियंत्रण कक्षाचे कार्यालयही याठिकाणीच असणार आहे. एक टेबल, एक खुर्ची एक टेलिफोन अशी ओळख असलेल्या कार्यालयास आता एक स्वतंत्र कार्यालय मिळत आहे. 24 तास सुरू राहणाऱ्या कार्यालयास वेळेत अचूक माहिती देणे सुलभ होणार आहे. शिवाय, जिल्ह्यातील विविध घटनांची माहिती याच कार्यालयातून उपलब्ध होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते होणार उद्घाटन
नियंत्रणकक्ष सुविधा केंद्र या दोन्ही कक्षाचे काम सध्या सुरू आहे. येत्या आठवडाभरात हे कार्यालय सेवेत येणार आहे. दोन्ही कार्यालयात स्वतंत्र कर्मचारी नियुक्त असणार आहेत. या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात आले.