आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Set Meter Of Water Purification Center, News In Solapur

उजनीच्या पाण्याला मीटर बसवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उजनीपंपगृहातून पाणी जलशद्धीकरण केंद्र येथे ८० दशलक्ष लिटर पाणी रोज (एलएलडी) येणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात ५८ एमएलडीच येत असल्याचे मीटरवरून दिसून आले. उजनी जलवाहिनीला नियमबाह्य पद्धतीने थेट जोड देत पुणे रस्त्यावरील एमआयडीसीला पाणीपुरवठा दिला आहे. त्यातून ठरल्याप्रमाणे आठ एमएलडीऐवजी २२ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. याची तपासणी करण्याची मागणी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

एमआयडीसीला रोज आठ तास पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता अंबऋषी रोडे यांनी सांगितले. उजनीवरून येणाऱ्या पाण्यास मीटर बसवल्याने रोज शहरास ६० एमएलडी पाणी उपलब्ध होत असल्याचे दिसून येते.

प्रात्यक्षिक घेतल्यास स्पष्ट
-पाकणी,एमआयडीसी, एमबीआर टाकी येथील पाणी मोजण्याचे मीटर बसवले असून, यात तफावत असल्याचे दिसून येते. एमआयडीसीला रोज २४ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. १६ एमएलडी पाणी त्यांना मनपाकडून जास्त दिले जाते. प्रात्यक्षिक घ्या म्हणजे सर्व बाब स्पष्ट होईल.” प्रवीणडोंगरे, उपमहापौर

तपासूनपाहू
-एमआयडीसीलारोज सात तास पाणीपुरवठा उजनी लाइनवरून करण्यात येत आहे. त्यांना आठ तासात आठ एमएलडी पाणी दिले जाते. मीटरची पाहाणी करून पाणी मोजू.” अंबऋषीरोडे, मनपासार्वजनिक आरोग्य अभियंता
उपमहापौर मनपा अधिकाऱ्यांकडून पाहणी
उपमहापौरप्रवीण डोंगरे, मनपा सार्वजनिक आरोग्य अभियंता अंबऋषी रोडे यांनी मनपा अधिकाऱ्यांसह पाकणी, एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्र, पुणे नाका येथील एमबीआर टाकी येथे पाहणी केली.

तीनठिकाणी मीटर
पाण्याच्याऑडिटसाठी तीन ठिकाणी मीटर बसवण्यात आले आहेत. महिन्यापूर्वी पाकणी जलशुद्धीकरण केंद्र येथे तर एमबीआर पाणी टाकीजवळ पंधरा दिवसांपूर्वी तर एमआयडीसी केंद्रात दोन दिवसांपूर्वी मीटर बसवले आहे.
एमआयडीसी; मेन लाइनला खालून जोड
पाकणीजलशुद्धीकरण केंद्रातून एमआयडीसीला पाणी देणे आवश्यक असताना उजनी मेन लाइनला खालून जोड देऊन १६ इंची पाइपने पाणी घेण्यात येत आहे. ते चुकीचे आहे. तेथेच पाण्याचे मीटर बसवणे आवश्यक असताना एमआयडीसीतील जलशुद्धीकरण केंद्रात बसवण्यात आल्याचे दिसून आले. गुरुवारच्या आकडेवारीनुसार दुपारी बारा ते सायंकाळी सातपर्यंत सात एमएलडी पाणीपुरवठा झाल्याचे दिसून आले.