आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयपीएल’वर सट्टा; सोलापूरात सात अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- इंडियन प्रीमियर लिगच्या (आयपीएल) सामन्यांवर सट्टा लावणा-या सात जणांना अटक करण्यात सोलापूर पोलिसांना यश आले आहे. या बेटींगचे कनेक्शन धुळे येथे असल्याचे आता प्राथमिक तपासात पुढे आले आहे. रविवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराईज हैदराबाद या सामन्यावर तुळजापूरवेस भागातील बुधले गल्लीतील एका ठिकाणी सट्टा लावला जात होता.

पोलिसांनी गोविंद श्रीगिरी, सम्राट माने, गुरूशरण कोनापूरे, अतुल शिरसेट्टी, मनोज मदकोणे, परशुराम लडवा, राजेशाम ओझा या सट्टेबाजांना अटक केली. पोलिस चौकशीत धुळ्याचा रवी शर्मा सोलापुरातून बेटिंग घेत असल्याचे समोर आले आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी एक हजाराला साडेसातशे तर हैदराबाद सनराईजला साडेसातशेला एक हजार सट्टा लावला जात होता. सातही आरोपींना सोमवारी जामीन मंजूर झाला.