आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर शहरात चोरांनी सात तोळे दागिने पळवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जुना पुणे नाका परिसरातील वसंत विहार गायत्रीनगरात राहणारे अनिरुद्ध चोरमुले यांच्या घरात चोरी झाली. मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून कपाटातील सात तोळे सोन्याचे आणि वीस तोळे चांदीचे दागिने चोरीस गेले आहेत. शनिवारी दुपारी दोन ते रविवारी पहाटे दोनच्या कालावधीत ही घटना घडली. चोरमुले यांनी सकाळी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.


दोन तोळे सोन्याची साखळी, अडीच तोळ्याच्या पाच अंगठय़ा (प्रत्येक अर्धा तोळे), एक तोळे ब्रेसलेट, सोन्याचे कर्णफुले एक तोळे, पाच ग्रॅमचे कर्णफुले, अर्धा तोळे नथ आणि वीस तोळे चांदीचे दागिने चोरीस गेले आहेत. चोरमुले यांचे जुना पूना नाक्याजवळ हॉटेल आहे. दिवसभर तिथे थांबून पुन्हा हॉटेलात आले. रात्री दोनच्या सुमाराला हॉटेलातून घरी गेल्यावर घर फोडल्याचे लक्षात आले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस व श्वानपथक आले, पण जागेवरच श्वान घुटमळले. फिंगर प्रिंट घेण्यात आले आहेत.


पोलिस काय करताहेत?
शहरात दररोज चोर्‍या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. सातही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अनेक घटनांचा तपास रखडला आहे. गुन्हे शाखा घरफोड्यांचा तपास का लावत नाही. शंभर ते सव्वाशे पोलिस अधिकारी, कर्मचारी असताना गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले नाही.


तपास सुरू आहे
अशा पद्धतीने गुन्हे, चोरी करणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तपासण्याचे काम करण्यात येत आहे. फिंगर प्रिंटच्या आधारे नाव निष्पन्न होते का, याचा तपास सुरू आहे.’’ राकेश हांडे, साहाय्यक पोलिस निरीक्षक, फौजदार चावडी