आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार नवी आरोग्य केंद्रे, तर सातची होणार दुरुस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राष्ट्रीय आरोग्य मोहीम योजनेअंतर्गत शहरात सात प्राथमिक आरोग्य केंद्रे बांधण्यात येणार आहेत. हद्दवाढ भागातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रे बांधण्यासाठी प्रत्येकी ७० लाख प्रमाणे कोटी ८० लाख मंजूर झाले.
शहरातील विद्यमान सात आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी ७० लाखांची तरतूद केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. एकूण साडेतीन कोटी मंजूर झाले आहेत. पुढील प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.
नवीन आरोग्य केंद्र बांधणी, तसेच विद्यमान केंद्रांची दुरुस्ती आणि दोन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने सोलापूर शहरासाठी १४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातील मल्टिस्पेशालिटीचे अनुदान अद्याप आले नाही. अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह (डफरीन) आणि बाॅईस हाॅस्पिटल येथे मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल करण्यात येणार आहे. याशिवाय शहरात आठ, तर हद्दवाढ भागात चार प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
यांची होणार दुरुस्ती : भावना ऋषी,रामवाडी, मजरेवाडी, जिजामाता, जोडभावी पेठ, दाराशा आणि साबळे दवाखाना. नवीन आरोग्य
केंद्र : देगाव,मुद्रा सन सिटी, सोरेगाव, नई जिंदगी
चार आरोग्य केंद्रे बांधणे सात आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीबाबत मनपा आरोग्य नगर अभियंता विभागाची प्राथिमक बैठक झाल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डाॅ. जयंती आडके यांनी दिली.
१० लाख दुरुस्तीसाठी सात आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी महापालिकेने प्रत्येकी सुमारे पावणेनऊ लाख रुपयांची मागणी केली होती. केंद्राने प्रत्येकी दहा लाख दिले. मागणी केलेल्या रकमेपेक्षा १.८ ते १.१४ लाख रक्कम जास्त दिली.
बातम्या आणखी आहेत...