आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयटीआय शैक्षणिक शुल्कवाढ रद्द करा, एसएफआयचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शैक्षणिक शुल्क वाढ मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)ने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शुल्कवाढ रद्द करा, नकारात्मक गुणांकन पद्धत बंद करा, एक हजार रुपयांचे विद्यावेतन द्या आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
संघटनेच्या जिल्हा समितीने मोर्चाचे आयोजन केले होते. त्यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. विजापूर रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेपासून त्यास सुरुवात झाली. कंबर तलाव, पत्रकार भवन, सात रस्ता, रंगभवन येथून जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर हा मोर्चा धडकला. आयटीआय विद्यार्थ्यांची शुल्कवाढ रद्द करून त्यांचे नुकसान टाळण्याचे आवाहन संघटनेने केले. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
संघटनेचे दत्ता चव्हाण यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. या वेळी सचिव मीरा कांबळे, पूजा कांबळे, मल्लेशम कारमपुरी, जयकुमार सोनकांबळे, शामसुंदर आडम, अजय गाजूल, विश्वजीत बिराजदार, रामकृष्ण ताटीपामूल, राहुल जाधव, सुनील धुंबड, प्रियांका बुधवंत सहभागी होते.
एसएफआयच्या वतीने शनिवारी मोर्चा काढण्यात आला.
तंत्रशिक्षण विभागाने संकटात टाकले
- उच्च तंत्रशिक्षण विभागाने फीवाढीचे निर्देश देऊन विद्यार्थ्यांना संकटात टाकले आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. कामगारांच्या हातात काम नाही. कर्जामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. अशा स्थितीत शिक्षण शुल्क वाढवल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण कसे घेतील?
दत्ता चव्हाण, राज्यसचिव एसएफआय