आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Bansod News In Marathi, BJP, Congress, Sushilkumar Shinde

शेतकर्‍यांच्या प्रश्नी काँग्रेसला गांभीर्य नाही- शरद बनसोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ - पाणी, वीज आणि योग्य दराअभावी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. अशा परिस्थितीत दुष्काळामुळे शेतकरी नागवला गेला. मात्र, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्यासाठी काही केले नाही. एकूणच काँग्रेसला शेतकर्‍यांच्या प्रश्नी गांभीर्य नसल्याची टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अँड. शरद बनसोडे यांनी केली. कोरवली येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
काँग्रेसकडून देशाची लूट सुरू असल्याचा आरोप करत अँड. बनसोडे म्हणाले, ‘महागाई व बेरोजगारीने सर्वसामान्य माणूस रस्त्यावर आला आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस केवळ सत्तेच्या भांडणात व्यस्त आहेत. महायुतीने शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केला. सत्ताधारी गारपिटीनंतर तोकडी मदत देऊन मते मागत आहेत. नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये वीज, रस्ते, पाणी या प्रश्नांसह शेतीविकासाने राज्याला एक मॉडेल बनवले. देशाच्या उज्‍जवल भवितव्यासाठी त्यांना पंतप्रधान बनवणे गरजेचे आहे. त्यासाठी मला निवडून द्या.’
यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब गायकवाड, दशरथ काळे, मनसेचे प्रताप शेळके उपस्थित होते. तसेच उमेदवार अँड. शरद बनसोडे यांनी हराळवाडी, कोरवली, कामती, कुरुल, शिंगोली, तरटगाव, कामती येथेही भेटी दिल्या.
महिला सक्षमीकरणाची घोषणा पोकळ
काँग्रेस आघाडी सरकारची महिला सक्षमीकरणाची घोषणा पोकळ ठरल्याची टीका आमदार गोर्‍हे यांनी केली. देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सत्ताधार्‍यांनी त्या रोखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आव आणला. त्यासाठी योजनाही आणली. मात्र, त्यासाठी काही केलेले नसल्याचे त्यांनी म्हटले.