आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Bansode Speak In Rally At Solapur, Divya Marathi

विकास हवा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही- शरद बनसोडे यांचा दावा .

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर- सामान्य जनतेला न्याय व विकास हवा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. सुशीलकुमार शिंदेंना विकासाची जाणीव नाही. त्यांनी सोलापुरात करेरा कंपनीचे भूमिपूजन केले पण त्या कंपनीचा पत्ताच नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार शरद बनसोडे यांनी केले.

शुक्रवारी रात्री मंद्रूप येथील प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, तालुकाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, प्रचारप्रमुख शंकर वाघमारे, हणमंत कुलकर्णी, हेमंतकुमार स्वामी, मंद्रूप शहराध्यक्ष संतोष बरूरे, महेश मेंडगुदळे, शिवपुत्र जोडमोटे, र्शीकांत बबलेश्वर आदी उपस्थित होते. जर सामान्य जनतेला न्याय व विकास हवा असेल तर भाजपला विजयी करा, असे आवाहन र्शी. बनसोडे यांनी या वेळी केले.

शहाजी पवार यांनी काँग्रेसच्या मंद्रूप येथे गुरुवारी झालेल्या सभेचा समाचार घेतला. मंद्रूपमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद आहे असे म्हणतात. चार टवाळकी पोरं भाजपच्या पाठीशी असल्याचे सांगतात. पण ही टवाळ पोरंच आमची ताकद आहे. गेंड्याची कातडी असलेल्या काँग्रेस आघाडी सरकारला गाठण्याची ही वेळ आहे. त्यासाठी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष गायकवाड यांनी बनसोडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यतीन शहा यांनी सूत्रसंचालन केले. याशिवाय कंदलगाव व औराद येथे ही बनसोडे यांच्या प्रचारार्थ सभा झाली.