आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Ajit Pawar Increases Problem In Solapur Of Water

पवार काका-पुतण्यांनी वाढवली अडचण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- उजनी धरणात जवळपास 30 टीएमसी पाणी असताना, त्याचे नियोजन न झाल्याने आणि पाण्याचा हिशेब लागत नसल्याने सोलापूरवर जलसंकट ओढवले आहे. पाण्याशी संबंधित खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. आज उजनी धरण रिकामे होत असताना आणि पुण्याच्या धरणांमध्ये पाणी असताना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हात वर केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचीच अडचण वाढली आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अकलूजमध्ये शुक्रवारी बैठक झाली. त्यात पुण्यातून पाणी देण्याबाबत पवार काका-पुतण्यांनी स्पष्ट नकार दिला. शेतीसाठी तर पाहिजेच पण पिण्यासाठी व जनावरांच्या चार्‍यासाठीही पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने आता मतदारांसमोर कोणत्या तोंडाने जायचे असा प्रश्न जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आता पडला आहे. अकलूज येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि आपले नेते हा प्रश्न सोडवतील, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. शरद पवार यांनी पुण्यातल्या पाण्याचा नाद सोडायला सांगताना कर्नाटकातील आलमट्टीकडे बोट दाखवून पाणी मागण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असल्याचे सांगत राष्ट्रवादीने हात झटकण्याचे काम केले आहे. भविष्यातील दुष्काळाच्या काळजीत असलेल्या कर्नाटककडून आलमट्टीचे पाणी विकत आणण्याची भाषा अजित पवारांनी केली आहे. पाणी विकत घेण्याचा विचार आता करण्यापेक्षा उजनी धरणात मुबलक असलेला पाणीसाठा नियोजन डावलून बेसुमार उसासाठी सोडले तेव्हाच उपमुख्यमंत्र्यांनी जागरूकता दाखवली असती तर शेजार्‍याकडे उसने अथवा विकत मागण्याची वेळच आली नसती.

कर्नाटकात भाजपचे सरकार असल्याने जिल्हा भाजपने आलमट्टीऐवजी पुण्यातून पाणी आणण्याचा सल्ला दिला आहे. पुण्यातील धरणे 50 टक्के भरल्यानंतर नियमानुसार खाली का पाणी सोडले नाही? याबाबत मात्र उपमुख्यमंत्री मौन बाळगून आहेत. दुष्काळ असतानाही यंदा जिल्ह्यात 47 लाख टन उसाचे गाळप झाले असल्याने उजनीचे पाणी कोणी पळवले, हे शोधायला कुठेही जायची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पाणीसाठे पिण्यासाठी राखीव केल्यानंतरही उजनीचे तीन टीएमसी पाणी पुणे जिल्ह्याला का दिले? डेअरीला दिल्याचे शरद पवार म्हणाले. पण, आज जनावरांप्रमाणेच माणसांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील धरणाच्या काळजीप्रमाणेच मतदारसंघाचीही काळजी माढय़ाच्या खासदारांनी करावयाची आहे.