आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Nationalist Congress, Divya Marathi

कोणत्याही पक्षाला अस्पृश्य मानत नाही,शरद पवार यांचा पुनरुच्चार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘मी कोणत्याही राजकीय पक्षाला अस्पृश्य मानत नाही. एखादा प्रश्न सोडवण्यासाठी आपला सर्वच पक्षनेत्यांशी सुसंवाद असतो’, असे सूचक उद्गार केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी बुधवारी काढले. मात्र आमची आघाडी काँग्रेसबरोबरच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगोल्यात ते पत्रकारांशी बोलत होते. संयुक्त पुरोगामी आघाडीचेच सरकार सत्तेवर येईल. डॉ. मनमोहन सिंग हेच स्थिर सरकार देऊन सर्वांगीण विकास करतील, असा दावाही पवारांनी केला.


‘मीच उमेदवार आहे, असे समजून काम करा. किरकोळ मतभेदांसाठी पक्षाचे नुकसान करू नका’, अशा शब्दांत पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना समज दिली. माढा मतदारसंघातील नेते आणि पक्षाच्या पदाधिका-यांशी चर्चा करून विजयसिंह मोहिते यांना सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.


मोदींची लाट नाही
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची लाट महाराष्‍ट्रात नाही. तशी हवा फक्त इलेक्ट्रॉनिक मिडीयाने तयार केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्याचा काहीही परिणाम दिसणार नाही, असे पवार म्हणाले.