आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Nationalist Congress, Divya Marathi

काँग्रेसकाळात गुजरातचा विकास, शरद पवार यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज/बार्शी - ‘विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र कितीतरी पटीने गुजरातच्या पुढे आहे. गुजरातमध्ये काँग्रेसच्याच काळात विकास झाला आहे. मात्र, नरेंद्र मोदी त्याचे श्रेय लाटताहेत,’ अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली. शनिवारी माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते यांच्या प्रचारासाठी अकलूज आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ बाश्री येथे आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. तसेच त्यांनी भाजपवर ढोंगीपणाचा आरोप केला. ‘खासदार निवडून येण्याचा पत्ता नसताना मोदी हे पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत आहेत. प्रत्येक पक्षाचे निवडून येणारे खासदार पंतप्रधान ठरवतात. मात्र, हे लोकशाहीला मूठमाती देऊन भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले. यावरून उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग अशीच त्यांची स्थिती आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.


भाजपला शेतकर्‍यांचा खोटा पुळका असल्याचे सांगत पवार यांनी सांगितले. गरिबांसाठी अन्नसुरक्षा योजना आणली. शेती, औद्योगिकीकरण, व्यापार, उद्योग वाढवण्यासाठी धोरण आखल्याचे त्यांनी म्हटले.


आम्हीही गाड्या पेटवायच्या?
‘फसवी आंदोलने करून शेतकरी संघटना साखर कारखानदारी मोडायला निघाली आहे. ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. 46 गुंठे जमीन असलेल्या खोत यांच्याकडे आडीच कोटींचा बंगला आला कोठून, असा सवाल पवार यांनी केला.


कोणीही बोट धरणार नाही
विजयसिंह मोहिते म्हणाले, ‘मी सुरुवातीला वसंतदादा पाटील व नंतर पवारांचे नेतृत्व मानले. माळशिरसच्या जनतेने सलग सहा वेळा निवडून दिले. आजपर्यंत कोणालाही बोट दाखवायला जागा नाही, असे स्वच्छ काम केले.’