आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Nationalist Congress Party, Divya Marathi

पवारांना जमले नाही, ते विजयसिंह कसे करणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शरद पवार हे केंद्रीय मंत्रिमंडळात दुसर्‍या क्रमांकाचे नेते आहेत. तरीही त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. आता ती विजयसिंह कशी पूर्ण करणार, असा सवाल प्रतापसिंह मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. शरद पवार यांच्यामुळे माढा मतदारसंघात विकास होईल, अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली आहे. माण, खटाव भागातील पाण्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे. सत्तारूढ पक्षाने जिल्ह्यावर मोठा अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी केला.


कोणत्याही स्थितीत माघार नाही
अर्ज भरण्यापूर्वी प्रतापसिंह मोहिते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माझे बंधू विजयसिंह मोहिते यांना मुद्दामहून उमेदवारी दिली. त्यांनीच आमच्यात भांडण लावले आहे. माढा मतदारसंघातील शेतकर्‍यांचे प्रश्न, विकासाचे मुद्दे घेऊन मी निवडणूक लढवत आहे. मी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.’