आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर दलालांने 26 शिक्षकांची केली फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आर्थिक गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून तब्बल 26 आयटीआय शिक्षकांची फसवणूक केल्याप्रकरणी शेअर दलालाविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. के. जाधव यांनी दिले आहेत. आयटीआय शिक्षक दीपक गायकवाड यांच्या तक्रारीवरून शेअर दलाल विष्णू जित्री (वय 42, रा. कर्णिकनगर, सोलापूर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल दाखल करण्याचा आदेश आहे.

पन्नास हजाराला सात हजार, एक लाखाला पंधरा हजार रुपये मिळवाल अशा प्रकारचे आमिष दाखवले होते. आयटीआय शिक्षक म्हणून कार्यरत असलेले गायकवाड व त्यांच्या सहकार्‍यांनी पैसे गुंतवले. कालांतराने त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. कांचनलक्ष्मी इनव्हेस्टमेंट अँड सेक्युरिटीस या नावाने शेअर ब्रोकिंगचा व्यवसाय असल्याचे त्याने सर्वांना सांगितले होते. 18 जानेवारी 2012 पासून गायकवाड यांनी एक लाख रुपये गुंतवले. जूनपर्यंत त्याचा लाभांश दिला.

त्यानंतर पुन्हा पाच लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले. त्याबाबतची कागदपत्रे मागतली असता, हातऊसने पैसे घेतल्याचे नोटरी करून दिले. आतापर्यंत त्याचा लाभही दिला नाही. उलट न वटणारे चेक दिले. याबाबत फसवणूक झाल्यामुळे 11 जानेवारी 2013 रोजी त्यांनी पोलिस आयुक्तांना भेटून तक्रार अर्ज दिला. तक्रारीची दखल न घेतल्याने गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने संशयित जित्री यांच्यावर गुन्हा दाखल करून अहवाल देण्याचा आदेश जेलरोड पोलिसांना दिला आहे. अँड. शशी कुलकर्णी, अँड. प्रशांत नवगिरे, अँड. गुरुदत्त बोरगावकर यांच्यामार्फत न्यायालयात खासगी फिर्याद दिली होती.