आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shefi Inamdar News In Marathi, Nationalist Congress, Solapur, Divya Marathi

राष्ट्रवादीच्या शफी इनामदारांचा काँग्रेसवर निशाणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रांतिक सदस्यपदाचा राजीनामा देत शफी इनामदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम तर केलाच पण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारत गारमेंट प्रकरणात आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला. इनामदार यांचे आरोप बेईनामी असल्याचे सांगत माजी महापौर खाजादाऊद नालबंद आणि ए. डी. चिनीवार यांनीही पत्रपरिषद घेऊन त्यांच्यावर पलटवार केला. काँग्रेस-राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदीचे राजकीय वतरुळात चांगलेच पडसाद उमटले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शफी इनामदार यांनी मंगळवारी मुस्लिम समाजाचा मेळावा आयोजित केला आहे. रंगभवन येथे मुस्लिम समाजाचा मेळावा होणार असल्याची माहिती देत, त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य केले. भारत गारमेंटसंदर्भातील निकाल विरोधात जावा, यासाठी सेवादलाचे चंद्रकांत दायमा व आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिस मुख्यालयातील मशिदीचा प्रश्न सोडवला नाही, विधानसभेत प्रतिनिधित्व दिले नाही, अल्पसंख्याकाचा आर्थिक स्तर उंचवला नाही, असे आरोप केले. त्यांच्यासोबत इम्तियाज शेख, अब्दुलगनी पठाण, बिलाल शेख, मोईयोद्दीन मणियार, मौलाना युसूफ, तस्लिमा शेख उपस्थित होते.
78 लाखांच्या अपहाराचा आरोप
राष्ट्रवादीचे माजी महापौर खाजादाऊद नालबंद, सनाउल्ला शेख व सहकार्‍यांनी इनामदार यांचा हा ‘ब्लॅकमेल’ करण्याचा प्रयत्न असल्याचा पलटवार केला आहे. निवडणुकांच्या तोंडावर मुस्लिम समाजाचे नाव पुढे करून स्वत:चे महत्त्व वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. भारत गारमेंटच्या सदस्यांना अंधारात ठेवून 78 लाखांचा अपहार केला. चौकशीत हे समोर आल्याचा आरोप ए.डी. चिनीवार व रफिक हुंडेकरी यांनी केला.
जातीचे राजकारण नको
इनामदार यांनी जातीचे राजकारण पुढे आणू नये. त्यांना ते शोभणारे नाही. भारत गारमेंट प्रकरणाचा आणि माझा काहीही संबंध नाही. मी या प्रकरणासंदर्भात कोणाला काही सांगितलेही नाही. विनाकारण मला गोवण्याचा प्रयत्न करू नये. ही आमची शिकवण नाही. प्रणिती शिंदे, आमदार