आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shegaon Murder Case: Advocat, Sidramppa Cross Checking

शेगाव खून प्रकरण : वकील, सिद्रामप्पांकडूनही उलट तपासणी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शेगाव खून-खटलाप्रकरणी आरोपींच्या वकिलांनी उलट तपासणीत विचारलेल्या बहुतांश प्रश्नांना आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी नाकारले, शिवाय वकिलांना प्रतिप्रश्न करून त्यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. या उलट तपासणीची नोंद अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर गुरुवारी घेण्यात आली. एका प्रश्नाच्या उत्तरात आमदार पाटील यांनी राजकारणाचे ज्ञान नसल्याचे सांगितले.


26 सप्टेंबर 2009 रोजी शेगाव येथे सिद्रामप्पा पाटील हे भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेले असता शंकर म्हेत्रे यांच्यासह 28 जणांनी लोखंडी सळई, तलवारी, हंटर, काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला आणि यामध्ये भीमाशंकर ईश्वरप्पा कोरे याचा मृत्यू झाला होता. सिद्धाराम म्हेत्रे मंत्री असल्याने दबावाखाली पोलिस तपास व्यवस्थित करत नव्हते, तसेच पोलिसांनी फिर्यादीचा जबाब त्यास वाचून दाखवला नाही, अशी साक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी बुधवारी दिली होती. यावर गुरुवारी आरोपीकडून अ‍ॅड. व्ही. डी. फताटे, अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी उलट तपास केला. उलट तपासामध्ये विचारण्यात आलेले सर्व प्रश्न खोटे असल्याचे आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी न्यायालयात ठामपणे सांगितले.


वकील, सिद्रामप्पांकडूनही उलट तपासणी!
व्यवस्थित करत नव्हते, तसेच पोलिसांनी फिर्यादीचा जबाब त्यास वाचून दाखवला नाही, अशी साक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी बुधवारी दिली होती. यावर गुरुवारी आरोपीकडून अ‍ॅड. व्ही. डी. फताटे, अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी उलट तपास केला. उलट तपासामध्ये विचारण्यात आलेले सर्व प्रश्न खोटे असल्याचे आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी न्यायालयात ठामपणे सांगितले.


उलट तपास
पोलिसांसमोर एक आणि न्यायालयात दुसरा जबाब आहे, घटनेवेळी तुम्ही हजर नव्हता, त्यावेळी तुमचा शर्ट फाटला नाही, तुम्हीच राजकीय द्वेषातून श्रीमंत कोरे याला खोटी केस दाखल करावयास लावले, तुम्हीच सिध्दाराम व शंकर म्हेत्रे यांचे नाव घेण्यास सांगितले, म्हेत्रे अडकले म्हणून तुम्ही निवडून आलात, डाव्या खांद्याला झालेल्या जखमेबाबत डॉक्टरांनी विचारणा केली होती का, आदी प्रश्न अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी उलट तपासणीत विचारले.

हे सर्व प्रश्न आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी नाकारले.
प्रश्न- अ‍ॅड. फताटे : पूर्वी आपण कॉँग्रेस, अपक्ष, भाजप, कॉँग्रेस नंतर भाजप असा राजकीय प्रवास केला का.
उत्तर-आमदार पाटील : होय.
प्रश्न : दक्षिण तालुका निवडणुकीत बाबूराव आणि तम्माराव हे तुमच्या विरोधात प्रचार करत होते का?
उत्तर : माहीत नाही.
प्रश्न : कोल्हापूरला आपल्यावर एक केस दाखल झाली आहे, पेपरमध्ये आले आहे?
उत्तर : माहीत नाही.
प्रश्न : कर्नाटकातील गुंडांना रिव्हॉल्व्हर सप्लाय करत होता म्हणून पोलिस अनेकवेळा तुमच्या घरी आले होते का?
उत्तर : नाही.
प्रश्न : दक्षिण तालुक्याच्या निवडणुकीवेळी तुमच्या कार्यकर्त्यांना अटक झाली म्हणून तुमचा पराभव झाला का?
उत्तर : - असे नाही.
प्रश्न : मुलाच्या निवडणुकीवेळी मारहाणीची केस सुरू आहे का?
उत्तर : नाही.
प्रश्न : बाबासाहेब तानवडे यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय आहे?
उत्तर : कोणी मेला की मलाच विचारणार काय?
प्रश्न : स्वामी समर्थ साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा तुमच्यावर आरोप आहे?
उत्तर : म्हेत्रेच्या सांगण्यावरून खटाटोप झाली.
प्रश्न : निवडणुकीत आडवे आले की त्याला अडकवायचे, नाही तर काटा काढायचा, असा तुमचा ‘नॅक’ आहे?
उत्तर : असं कसं होऊ शकतं.
प्रश्न : राजकारणात काय केल्यावर निवडून येता येते, याचे तुम्हाला 1995 ते 2009 पर्यंत राजकीय ज्ञान झाले असेल?
उत्तर : मला राजकीय ज्ञान काहीच नाही.


इंदिरा गांधींच्या खुनाबाबत विचारायचे राहिले का?
भीमाशंकर बनसोडे यांचा खून आणि बाबासाहेब तानवडे यांचा अपघात याबाबत संशय आपल्यावर होता, असा प्रश्न अ‍ॅड. फताटे यांनी विचारल्यावर आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी ‘इंदिरा गांधी यांच्या खुनाच्या संशयाबाबत विचारण्याचे तुमच्याकडून राहून गेल का’ असे त्यांनी नेहमीच्या शैलीत उलट तपासणीत उत्तर दिले.


राष्‍ट्रवादीचे नेते मला मानतात...
खटल्याच्या सुनावणीसंदर्भात अ‍ॅड. व्ही.डी. फताटे म्हणाले, आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी साक्ष नोंदवताना, ‘ राष्‍ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार, दिलीप सोपल, विजयसिंह मोहिते-पाटील, आर.आर. पाटील मला फार मानतात. या प्रकरणात मी त्यांना भेटलो, त्यांनी मला मदत करण्याचे आश्वासन दिले, असे सांगितले आहे. त्याचबरोबर उलट तपासणीवेळी आमदार पाटील यांनी भीमण्णा कोरे यांच्या मृत्यूचा वैद्यकीय अहवाल पाहता बाबूराव पाटील यांच्या कानाजवळ सळई खुपसली असे सांगितले. मात्र, पोलिस जबाबात भीमण्णा कोरे यांचा मृत्यू बंदुकीची गोळी लागून झाल्याचे सांगितले होते. आज वैद्यकीय अहवाल पाहताच ते गोंधळून गेले, असेही अ‍ॅड. फताटे यांनी सांगितले.