आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडिलांना गोळ्या घालून ठार मारणा-या आरोपीशीच मुलीने केला विवाह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: ‘माझे अपहरण झाले नाही. माझ्यावर कोणाचाही दबाव नाही’, असा जबाब शेगाव खून खटल्यातील प्रमुख साक्षीदार स्वाती कोरे यांनी शुक्रवारी नोंदविला. पोलिस अधीक्षक राजेश प्रधान यांनी जबाब नोंदवून घेतला.
2009 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भीमण्णा कोरे यांचा गोळ्या घालून खून झाला होता. याची फिर्याद र्शीमंत कोरे यांनी दिली. त्यांचीच मुलगी स्वाती यांनी आरोपी हणमंत पाटील याच्याबरोबर लातूर येथे सोमवारी प्रसिद्धीमाध्यमांसमोर लग्न केले. पाटीलवर प्रेम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्वाती कोरे यांचे अपहरण झाले असून अक्कलकोट पोलिस फिर्याद घेत नसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्रामप्पा पाटील व र्शीमंत कोरे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. यामुळे यास राजकीय स्वरूप आले. त्यानंतर शेगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. आता स्वाती कोरे यांच्या जबाबाकडे लक्ष लागले होते.