आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shegaon Murder Issue, Sidharam, Shankar And 19 People Are Blameless

शेगाव खून खटला; सिद्धाराम, शंकर म्हेत्रेंसह 19 ठरले निर्दोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- काँग्रेसचे कार्यकर्ते बाबूराव पाटील, प्रकाश पाटील यांनी गोळीबार करून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते भीमाशंकर कोरे यांचा खून केला, असे फिर्यादित र्शीमंत कोरे यांनी म्हटले आहे. साक्षीदारांनी पोलिसात जबाब देताना रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याचे सांगितले होते. न्यायालयातील जबाबात मात्र साक्षीदारांनी लोखंडी सळईने मारहाण झाल्याचे सांगितले. या विसंगतीचा फायदा बचाव पक्षाला झाला.

न्यायालयाने कायदेशीर बाबींच्या मुद्यावर दोघा पाटलांसह माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे आदी 19 जणांची निदरेष मुक्तता केली. पण मारहाणीच्या गुन्ह्यात मात्र अन्य दहा जणांना तीन वर्षे व एकाला चार वर्षे शिक्षा सुनावली. फिर्यादी पक्षातर्फे जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रतिज्ञापत्र सादर केले. विधानसभेची निवडणूक दोन दिवस असताना म्हेत्रेंना अटकपूर्व जामीन मंज़ूर झाला. दोन दिवस त्यांना प्रचारास मिळाले. बाराशे मतांनी म्हेत्रेंचा पराभव झाला होता.

वैद्यकीय अहवाल ही विसंगत, पोलिसांत जबाब गोळीबाराचा, न्यायालयात सळईने खूनाचा
चिथावणीखोर भाषणाचा पुरावा नाही

घटनेअगोदर सिद्धाराम म्हेत्रे यांनी चिथावणीखोर भाषण दिल्याचा मुद्दा समोर आला होता. सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा विश्वासार्ह ठरला नाही. शंकर म्हेत्रे यांच्याबाबत जबाब, वैद्यकीय अहवाल विसंगत आल्याने न्यायालयाचा साक्षीदारावर विश्वास बसला नाही.

न्यायालयाचे भाष्य
न्यायाधीशांनी आधी खुन्याच्या गुन्ह्यात निदरेष सोडल्याचे 19 जणांना सांगितले. त्यानंतर अन्य दहा जणांना वेगळ्या कक्षात उभे केले. तुम्हाला शिक्षा देण्यात येणार आहे, आपले काय म्हणणे आहे, अशी विचारणा केली. काहीनी आम्ही नोकरीला आहोत. आमच्यावर कुटुंब अवलंबून आहे, असे सांगितले. न्यायालयाने दखल न घेता मारहाणीच्या गुन्ह्यात तीन वर्षांची शिक्षा दिली.

सर्वोच्च् न्यायालयापर्यंत धाव
सिद्धाराम म्हेत्रे यांना अटकपूर्व जामीनासाठी सर्वोच्च् न्यायालयात जावे लागले. निकाल लागेपर्यंत जामीन मिळाला. याचा हवाला अन्य न्यायालयात वकील देत होते. त्यामुळे देशभरात 23 हजार जणांना निकाल लागेपर्यंत अटकपूर्व जामीन मिळत गेला.

न्यायदेवतेकडून न्याय मिळाला : म्हेत्रे
‘सत्यमेव जयते’ अशा शब्दांत सिध्दाराम म्हेत्रे यांनी भावना व्यक्त केली. राजकीय व्देषापोटी आम्हला यात गुंतविण्यात आले होते. खोटी साक्ष देण्यात आली. चार वर्षे आम्हाला मानसिक त्रास झाला. या निकालामुळे समाधानी असून न्याय मिळाल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कधी आमची कुणाशी भांडणे झाली नाहीत. आता दक्ष राहू.

धक्का बसला : आमदार पाटील
या निकालामुळे कोरे परिवाराला धक्का बसला आहे. त्यांना न्याय मिळाला नाही अशा शब्दांत आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

योग्य निकाल
न्यायालयाने दिलेला निकाल योग्य आहे. निदरेष सुटतील अशी अपेक्षा होती. कायद्याच्या कक्षेत राहून आम्हाला न्याय मिळाला.’’ अँड. व्ही. डी. फताटे, आरोपींचे वकील

महत्त्वाचे मुद्दे..
तीन न्यायालयात चालला खटला
अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आर. तिवारी, ए. एस. भैसारे, व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात चालला खटला.
पहिले आरोपपत्र : 24 डिसेंबर 2009
प्रकाश पाटीलविरुद्ध आरोप पत्र : 13 जून 2012
म्हेत्रेंविरुद्ध आरोपपत्र : 29ऑगस्ट 2012
बाबूराव पाटील विरुद्ध आरोपपत्र : 24 जानेवारी 2013
आरोपपत्र : 200 पानी
निकालपत्र : 82 पानी