आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांना कलेचे देणे द्या, माजी मंत्रीसुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कोल्हापूरच्या शिंदे अकॅडमीने "गिव्ह मी सम शाइन' एकांकिका सादर केली )
सोलापूर- मुलांवर कोणत्याही प्रकारचे दडपण ठेवता त्यांना कलेच्या विश्वात वावरू द्या. असे मत माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुख्य शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या बाल महोत्सवाच्या समारोप समारंभात बोलत होते.
हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महापौर सुशीला आबुटे, अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे, सुधीर खरटमल, सरचिटणीस धर्मा भोसले, चेतन नरोटे, श्रीशैल षटगार आर. एस. पाटील हे उपस्थित होते.
या वेळी शिंदे पुढे म्हणाले "आज स्पर्धेच्या युगात मुलांना पुढे नेण्यासाठी अनेक लोक पाल्यांना त्यांच्या मनाविरोधात विविध क्षेत्रात पाठवतात. पालकांनी तसे करता कलेचे देणे मुलांना द्यावे.' या वेळी त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बालनाट्य महोत्सव उपक्रमाचे कौतुक केले. मुलांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी असे व्यासपीठ देणे खूप गरजेचे आहे. या प्रसंगी शिंदे अकॅडमीच्या गणपती बाप्पा मोरया गिव्ह मी सम शाइन या दोन एकांकिका सादर झाल्या. सूत्रसंचालन सारिका अग्निहोत्री यांनी केले.
छोट्यांच्या हस्ते सत्कार
मान्यवरांचा सत्कार बाल कलावंतांनी केला. या वेळी अमोल धाबळे, आनंद खरबस, नागेंद्र माणेकरी, मीरा शेंडगे, शांता येळंबकर, अमोल देशमुख यांचा बाल नाट्य चळवळीच्या कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...