आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shinde And Modis Welcome Issue At Solapur, Divya Marathi

मोदी अन् शिंदेंचे स्वागत पण रंग वेगळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर लोकसभा निवडणुकीत गेल्या 40 वर्षांत पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे सोमवारी सकाळी सिद्धेश्वर एक्स्प्रेसने आगमन झाले. स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी गर्दी तर केली होती. पण तेथेही शिंदे यांचे आगमन होण्यापूर्वी कार्यकर्ते गटा-तटानेच उभारलेले चित्र दिसत होते. एरवी शिंदे यांच्या आगमनावेळी जल्लोष, उत्साह असायचा पण यावेळी हे चित्र नव्हते. पराभवाची गडद छाया एकूणच शिंदे यांच्या या दौर्‍यावर दिसत होती.

सोलापुरात आल्यानंतर आज सकाळपासूनच शिंदे यांनी ‘जनवात्सल्य’वर शहरातील मान्यवर तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी वैयक्तिक चर्चा करीत करण्यावर भर दिला होता. मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहरभाऊ डोंगरे, शहराध्यक्ष महेश गादेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, शहराध्यक्ष धर्मा भोसले, विष्णुपंत कोठे, महेश कोठे, यू. एन. बेरिया, सिद्धाराम म्हेत्रे आदीं नेते शिंदे यांच्याशी चर्चा करून पराभवाची कारणे सांगत होते. शिंदे हे शांतपणाने सर्वांचे म्हणणे ऐकून घेत होते. ‘लोकसभेची चूक विधानसभेला करू नका’, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. यावेळी शिंदे पराभवाचे शल्य लपविण्यासाठी चेहर्‍यावरती हास्य दाखवित होते, अन कार्यकर्ते गंभीर होते.