आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shinde, Minister Of Solapuratila Four Days And Four Shortfall

ग्रहमंत्री शिंदे यांचे चार दिवस आणि चार उणिवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 11 ते 14 जानेवारी असे चार दिवस मुक्काम ठोकून सोलापुरातल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यातून सोलापूरकरांना साहित्यिक, बौद्धिक, सांस्कृतिक मेजवानी मिळाली. विचारांचे मंथन झाले. चांगल्या मागण्या पुढे आल्या. परंतु शहराला पुढे नेणाºया घटकांची एकही बैठक झाली नाही. किमान पोलिस यंत्रणेचा आढावा तरी आवश्यक होता...

असे होते 4 कार्यक्रम

11 जानेवारी : माजी आमदार व्यंकप्पा मडूर यांचा जन्मशताब्दी सोहळा.
12 जानेवारी : शाहीर डॉ. अजीज नदाफ यांचा अमृत महोत्सवी गौरव सोहळा.
13 जानेवारी : ‘स्वातंत्र्यलढ्यातील सोलापूरचे दीपस्तंभ’ ग्रंथाचे प्रकाशन.
14 जानेवारी : दुधनी आणि जेऊरचा दौरा. काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक. विकासकामांचे भूमिपूजन.

यांचा विचार होईल..?


संयुक्त महाराष्ट्र चळवळ ते साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे ज्येष्ठ शाहीर डॉ. अजीज नदाफ यांना पद्मश्री किताब द्या : खासदार हुसेन दलवाई शाहीर अमर शेख यांचे बार्शीत स्मारक व इंदापूरनजीक अपघातस्थळी स्मृतिकेंद्राचे प्रयत्न व्हावेत. : मधुकरराव निराळे, लोककलेचे अभ्यासक
स्वातंत्र्यसमरात चार हुतात्म्यांचे मोठे योगदान. त्यांचा इतिहास पुढच्या पिढीला सांगण्यासाठी हुतात्मा स्मारक आवश्यक आहे : प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, लेखक
शहराच्या मध्यवर्ती असलेल्या किल्ल्यात ‘लाइट अ‍ॅण्ड साउंड शो’ केल्यास पर्यटक येऊ शकतील : डॉ. पी. के. जोशी, अध्यक्ष, हिने वाचनालय या आहेत चार उणिवा

1. नगरोत्थान योजनेतील कामांचा घ्यायला हवा होता आढावा. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना धमकावणाºया नगरसेवकांना दिली नाही तंबी.
2. केंद्रीय अर्थसंकल्पात सोलापूरच्या दृष्टीने काय तरतुदी हव्यात. याचा आढावा घेण्यासाठी उद्योजक, व्यापाºयांची हवी होती बैठक.
3. ‘सिमी’शी संबंधित संशयित तरुणांना अटक झाली. अशा संवेदनशील परिस्थितीवर पोलिस यंत्रणेची बैठक आवश्यकच होती.
4. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका, नेत्यांना सूचना, काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत असलेली धूसफूस दूर करण्यासाठी काँग्रेस भवनमध्ये ठिय्या हवा होता.