आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक विचारांचे फंडे ऐकताना मिळाला वेगळा अनुभव- शिव खेरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जागतिक पातळीवर व्यवस्थापन गुरू म्हणून ख्यातनाम असलेले शिव खेरा यांचा कार्यक्रम शनिवारी सोलापुरात झाला. ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित या कार्यक्रमास सोलापूरकरांनी भरभरून हजेरी लावली. शिव खेरा यांनी यशस्वी होण्यासाठी दिलेला मूलमंत्र अतिशय प्रेरणादायी आणि कृतिशील होता अशी प्रतिक्रिया सोलापुरातील शिक्षण, उद्योग, व्यापार आणि व्यवस्थापन क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. शिवाय ‘दिव्य मराठी’ने अशा प्रकारच्या वेगळ्या कार्यक्रमाची मेजवानी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच तरुणाईने चुकातून शिकून जीवनात यश मिळवण्याचे तंत्र आत्मसात करण्याचा संकल्प सोडल्याचे सांगितले.

शिव खेरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाच्या स्वरूपात मूलमंत्र दिले. योग्य दिशेने, आत्मविश्वासाने, आशावादी विचाराने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळतोच. हे त्यांचे विचार विद्यार्थ्यांसाठीच नसून सर्वांकरता आहे. ’’ डॉ.राजेश प्रधान, पोलिस अधीक्षक

तेजस आराध्ये, वालचंद अभियांत्रिकी : ते आले, ते बोलले आणि त्यांनी जिंकले सर्व सोलापूरकरांना. या शिवाय दुसरे शब्दच नाहीत. दीड तासाच्या वेळेत त्यांनी यशस्वी जीवनाची सूत्रे आश्चर्यकारक सोप्या भाषेत सांगितली.

शुभम मंजुगडे : यश मिळविण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते, याबद्दल मॅनेजमेंट गुरू शिव खेरा यांनी मोलाच्या टीप्स दिल्या. प्रत्येक माणसाकडून चुका या घडत असतात. पण तीच चूक वारंवार न करता त्यातून कसे शिकावे हे त्यांनी सांगितले. जीवन जगताना तांत्रिक शिक्षणाबरोबर प्रामाणिकतेचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.

मौलिक संदेश
जागतिक स्तरावर नावाजलेल्या व्यक्तिमत्वाला सोलापुरात आणल्याबद्दल ‘दिव्य मराठी’चे अभिनंदन. आयुष्यातल्या छोट्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात, हे र्शी. खेरा यांनी उत्तम पद्धतीने सांगितले. त्यांचा हा मौलिक संदेश कधीच विसरता येणार नाही.’’ अरविंद दोशी, उद्योगपती

खूपच प्रेरणादायी
शिव खेरा यांचे भाषण अतिशय प्रेरणादायी आणि कृतिशील होते. त्यांची मी अनेक पुस्तके वाचली; परंतु प्रत्यक्ष ऐकण्याचा योग पहिल्यांदाच होता. खूपच चांगला अनुभव होता.’’ जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम

व्यावहारिक जीवनात कसे बोलावे, कसे वागावे आणि आचरण कसे ठेवावे या गोष्टी र्शी. खेरा यांनी सांगितल्या. त्यामुळे खूप काही शिकता आले. नित्य जीवनात त्या अंगीकारण्याचे प्रयत्न करण्याचा निर्धार मी केला.’’ सत्यनारायण गुर्रम, उद्योजक

शिव खेरा यांच्या मार्गदर्शनाचा फायदा विद्यार्थ्यांना होईलच.विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूलमंत्र जीवनात उतरावा. एका कार्यक्रमवर न थांबता विद्यार्थ्यांच्याकरता असे विचार मांडणार्‍या वक्त्यांचे कार्यक्रम वारंवार घेणे अत्यावश्यक आहे.’’ रोहित जेऊरकर, संचालक अश्वत्थ कॉम्प्युटर

प्रतीक्षा जाजू , कल्चरल सेक्रेटरी वालचंद अभियांत्रिकी - शिव खेरांचा कार्यक्रम सोलापुरात आयोजिल्याबद्दल ‘दिव्य मराठी’चे आभार. आयुष्यात घडणार्‍या साध्या गोष्टी बरेच काही शिकवून जातात. शिव खेरा यांनी सांगितलेला यशाचा मूलमंत्र प्रेरणादायी आहे.

मॅनेजमेंट गुरूंच्या कार्यक्रमाबद्दल सोलापूरकरांनी मानले दिव्य मराठीचे आभार, शिव खेरा यांनी दिलेला यशाचा मूलमंत्र प्रेरणादायी असल्याची व्यक्त केली प्रतिक्रिया