आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘घटस्फोटा’ने जिल्ह्यात होईल उलथापालथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महाराष्ट्राच्या सत्तास्थानी असलेल्या राष्ट्रवादी-काँग्रेसने आघाडीची तर भाजप-शिवसेना महायुतीने काडीमोड घेण्यासाठी घटस्थापनेचा मंगल मुहूर्त साधला. आघाडी युतीमधील तुटी-फुटीने जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघाचे राजकीय चित्रच बदलले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप शिवसेना प्रमुख पक्षांनी विधानसभेच्या मैदानात स्वतंत्रपणे उतरण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत काय? याचा नेमका फायदा-तोटा कोणाला होईल. पक्षांतर केलेल्या नेत्यांचे काय? याचा घेतलेला हा धांडोळा.

भाजपकडे नाही उमेदवार
भाजपकडेअद्याप सक्षम उमेदवार नाही. नलिनी चंदेले यांनी गुरुवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राष्ट्रवादीने लोलगे, भाजपने चंदेले यांना उमेदवारी दिल्यास तीन महिला उमेदवारांमध्ये चांगली लढत रंगेल.
काँग्रेसला बसेल फटका राष्ट्रवादीच्यातुलनेत काँग्रेसकडे सक्षम यंत्रणा आहे. पण, महेश कोठे नलिनी चंदेले यांचा फटका काँग्रेसलाच बसण्याची शक्यता आहे. त्यात पद्मशाली समाजाची मतं मिळवण्यासाठी कोठे मुस्लिम समाजाची मतं खेचण्यासाठी एमआयएमकडून तौफिक शेख यांनी व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे काँग्रेसला पराकाष्ठा करावी लागणार आहे.
सोलापूर विद्यमानआमदार प्रणिती शिंदे आणि माकपचे नेते नरसय्या आड़म यांचा हा मुख्य मतदारसंघ. त्यात शिवसेनेने तगडा उमेदवार म्हणून महेश कोठे यांना पाठवले. त्यामुळे तिरंगी लढत होईल, असे वाटत असतानाच युती तुटली आणि आघाडीही. त्यामुळे या मतदारसंघात आणखी चार उमेदवारांची भर पडेल. शिवाय एमआयएमकडूनही मोठी तयारी सुरू असल्याने या मतदारसंघात बहुरंगी लढत होईल. शहर मध्यमध्ये राष्ट्रवादीकडून विद्या लोलगे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. माकप, काँग्रेस राष्ट्रवादी या धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये लढत रंगणार आहे. कोठेंनी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलीय. पण, ते उत्तमधून लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशमुख सापडले पेचात, विरोधात कोठेंची शक्यता
सोलापूर काँग्रेसचेनेते महेश कोठे शिवसेनेत दाखल झाल्यानंतर विजयाचा मार्ग सुकर मानणारे आमदार विजयकुमार देशमुख आता वेगळ्याच पेचात सापडले आहेत. कारण श्री. कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला तरी त्यांना ‘शहर उत्तर’ हाच मतदारसंघ सुरक्षित वाटतो. शिवसेनेने सर्वच इच्छुकांना संधी देण्याचे ठरवले. त्यामुळे आता इच्छुकांमध्ये जागांची अदलाबदल होईल. त्याचे चित्र शुक्रवारीच स्पष्ट होणार आहे. आधीच स्वकीयांकडून बंडखोरी आणि काँग्रेसने लिंगायत समाजाच्याच िवश्वनाथ चाकोते यांना िदलेल्या उमेदवारीने आमदार देशमुख अडचणीत आले. त्यात युती तुटल्याने आणखी पेच निर्माण झाला. त्यांच्या सोबत आमदार देशमुखही होते. परंतु सायंकाळच्या घडामोडींमुळे समीकरणे उलटली.
फाटाफुटीच्या राजकारणात डॉक हॉर्स कोणीही ठरेल
दक्षिण सोलापूर लोकसभानिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला २७ हजारांचे मताधिक्य दिल्याने काँग्रेसचा बालेकिल्ला धोक्यात असल्याचे चित्र दिसले. विधानसभेसाठी मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना-भाजपचा स्वतंत्र उमेदवार असतील. त्यात इतर पक्षांचीही भर पडेल. या फाटाफुटीच्या राजकारणात डॉक हॉर्स म्हणून कोणालाही विजयी लॉटरी लागू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसकडून आमदार दिलीप माने यांनी अर्ज भरला. त्यांनी विजयासाठी मोर्चेबांधणी केली. काँग्रेस अंतर्गत गटबाजीतून होणार विरोध पाहता राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही हाताशी धरण्याचा डावपेच टाकला होता. पण काँग्रेस राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.

सेनेचे मिरगणे भाजपच्या संपर्कात, चौरंगी लढत
सोलापूर महायुतीआघाडी तुटल्याने राज्यातील प्रमुख पक्ष आता एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोक्ून उभे राहणार आहेत. त्यामुळे िजल्हाच्या राजकारणाबरोबर आता बार्शी तालुक्याचे राजकारण बदलणार आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार पाणीपुरवठा मंत्री िदलीप सोपल यांची उमेदवारी निश्चित आहे. तर सेनेकडून सोपल यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळाली आहे. युती तुटल्याने सध्या सेनेत असलेले राजेंद्र मिरगणे हे भाजपच्या संपर्कात असून ते शुक्रवारी भाजपकडून अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसकडून सुधीर गाढवे यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बार्शीची यंदाची निवडणूक चौरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे.