आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी चौकात रिक्षा नियोजन पुन्हा कोलमडतेय!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -शिवाजी चौकात रिक्षा, अँपेरिक्षांची गर्दी होऊ नये म्हणून रिक्षाचालकांसाठी केलेले नवे नियमही पाळले जात नाहीत. नवीवेस पोलिस चौकीकडून शिवाजी चौकात (बसस्थानक) येताना रिक्षा चालकांना पेट्रोलपंप पाठीमागून अमृततुल्य हॉटेलजवळ रिक्षांना थांबा दिला आहे. नवीवेसच्या दिशेला जाण्यासाठी रिक्षा, अँपेरिक्षा यांना हॉटेल शेर-ए पंजाबच्या कोपर्‍यावरती थांबा होता. याचे नियोजन होताना दिसत नाही. रिक्षा थेट बसस्थानक परिसरात जात आहेत. येथील बुथ इतर कामासाठीच वापरला जात आहे. असाच रिकामा बूथ रेल्वे स्टेशन चौकातही आहे.
मार्केट यार्ड चौकात अपघात होऊ नयेत म्हणून शंभर मीटर नो-पार्किंग झोन केला आहे. दोन पाळ्यात पोलिस अधिकारी, कर्मचारी नेमलेत. आठ दिवसानंतर पुन्हा हातगाडी विक्रेते चौकात येऊन थांबतात. वाहतुकीचे नियम नागरिकांनी पाळावेत. पोलिसांनीही गंभीरपणे या नियमाची अंमलबजावणी करावी. अन्यथा वाहतूक नियोजन वारंवार कोलमडलेले असेल. बसस्थानकाकडे रिक्षांना जाण्यास बंदी घातली आहे. तसा बोर्डही लावला आहे. पोलिसांच्या समोरून रिक्षा जाताना दिसतात. मग येथे प्रवेश बंदी आहे की नाही ?
रेल्वे स्थानक चौकात वाहतूक बूथ आहे. पोलिस त्याचा वापरही करतात. पण लाऊड स्पीकर बसविला नसल्यामुळे रिक्षाचालक व नागरिकांना सूचना देता येत नाहीत. गर्दीच्या वेळी नियोजन करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.