आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivaji Maharaj Anniversary Occasion Speech In Solapur

थोर पुरुषांच्या प्रतिमा डोक्यावर घेण्यापेक्षा विचार डोक्यात घ्या- सुसेन नाईकवाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- थोर पुरुषांच्या प्रतिमा डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन आचरणात आणावेत, असे विचार बीड येथील सुसेन नाईकवाडी यांनी मांडले. शिवाजी प्रशालेत मराठा समाज सेवा मंडळातर्फे आयोजित शिवजन्मोत्सव व्याख्यानमालेचा शुभारंभ रविवारी झाला.
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना नाईकवाडी बोलत होते. शिवचरित्र आई या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे उद््घाटन महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे, स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री यांच्यासह अॅड. सुभाष साळुंखे, प्रा. महेश माने, विनायक पाटील, निवृत्ती केत, दत्ता भोसले, प्राचार्य सुरेश पवार, मुख्याध्यापक तानाजी माने, मुख्याध्यापिका उषा लोखंडे,जिल्हा परिषद सदस्य ऊर्मिला पाटील, नलिनी जगताप, विजय शाबादे, लालसिंग रजपूत आदी उपस्थित होते. सारिका महामुनी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. लोंढे यांनी शिवस्तुती सादर केली. हणमंतु बेसुळके यांनी आभार मानले.

खराइतिहास समोर यावा
नाईकवाडी म्हणाले, “विद्यार्थ्यांसमोर खरा इतिहास आला पाहिजे. शिवजयंतीला आपण शिवरायांना डोक्यावर घेतले पण डोक्यात शिवाजी गेलाच नाही. शिवबा घडवायचे असतील तर पहिल्यांदा जिजाऊ घडणे गरजेचे आहे. तेव्हाच समाज देशाचा विकास होईल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई यांचा आदर्श घेण्याची गरज आहे.”