आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवछत्रपती एकात्मतेचे प्रतीक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - छत्नपती शिवाजी महाराज हे समता, स्वातंत्र्य, न्याय, समानता बंधूभाव याचे आचरणकर्ते राजे होते. पवित्र कुराणाबद्दल देखील शिवरायांना अत्यंत आदर होता. त्यामुळे महाराज हे एकात्मतेचे प्रतीक होते, असे प्रतिपादन मराठा सेवा संघ छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांनी सोमवारी केले.

राष्ट्रप्रेमी मराठा-मुस्लिम ब्रिगेड जोडो अभियान महाराष्ट्रभर चालू आहे. त्याअंतर्गत समाजकल्याण केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात छत्नपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडची घोषणा सोमवारी करण्यात आली. त्यावेळी पाटील बोलत होते. या वेळी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शिरीष जाधव, शहराध्यक्ष र्शीराम गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष महेश सावंत आदींची प्रमुख उपस्थित होती.

कर्नल पाटील म्हणाले की, शिवरायांचा मुस्लिम सहकारी बांधवावर प्रचंड विश्वास होता. त्यामुळेच त्यांच्या पदरी असलेल्या शरीर रक्षकांपैकी 38 शरीर रक्षक मुसलमान होते. छत्नपती शिवाजी महाराजांवर इतर समाजाप्रमाणे मुस्लिम बांधवांचा पूर्ण अधिकार आहे. आजच्या नव्या पिढीला हा इतिहास कळण्याची गरज आहे.

चुकीचा इतिहास रंगवला

बालपणाच्या शिक्षणात शिवराय व अफजलखान भेटीचे चित्न पुस्तकात छापले. सर्वधर्मिय बालकांनी शिवाजी महाराज यांना हिंदूचा प्रतिनिधी तर अफजलखानास कट्टर मुसलमान मानून गैरसमज पसरवला गेला. इतिहास साक्षी आहे की छत्नपती शिवाजी महाराजांच्या मनात कोणत्याही जातीविषयी द्वेष अथवा दुजाभाव नव्हता, असेही ते म्हणाले.

आरोग्य मूलभूत गरज

सध्या देशात शिक्षण आणि आरोग्याची खूप वाईट अवस्था आहे. या दोन्ही गरजा मूलभूत गरजा झाल्या आहेत. शाळांची आणि रुग्णालयांची अवस्था खूपच वाईट झाली आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.