आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivaji, Shahu, Phule And Dr. Babasaheb Ambedkar News

सीमेपल्याड पोहोचले शिवाजी, फुले, शाहू आणि आंबेडकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उर्दू लेखक अँड. एस. एस. गाझियोद्दिन यांना सीमेपलीकडे राहाणार्‍या एकाचा इ-मेल आला आणि सुखद धक्का देऊन गेला. छत्रपती शिवाजी, थोर समाजसुधारक महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज अणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय घडवून दिल्याबद्दल आनंद व्यक्त करणारा आणि आभार मानणारा तो इ-मेल होता.
अँड. गाझियोद्दिन यांनी ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे लिखित शिवाजी कौन थे? उर्दूत आणले, तर भारतीय त्रिरत्न फुले, शाहू व आंबेडकर यांचे जीवन, विचार आणि कार्य सांगणारी तीन स्वतंत्र पुस्तके ऊदरूत त्यांनी लिहिली आहेत. ती पाकिस्तानात पोहोचली आहेत. याची प्रचिती सिंध प्रांतातील इस्लामकोट येथील धनश्यामदास नारवाणी यांनी अँड. गाझियोद्दिन यांना पाठवलेल्या इ-मेलमधून आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते नारवाणी लिहितात, तुमची दोन पुस्तके वाचली. गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कौन थे?’ हे भाषांतर आणि तुम्ही लिहिलेले महात्मा फुले. सध्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात और कारनामे’ वाचत आहे. ते पुढे लिहितात, इस्लामकोटसारख्या दुर्गम भागात राहून या थोर लोकांविषयी वाचणे अतिशय आनंदाचा भाग आहे. खूपच चांगले काम झाले आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा!
आनंद, सुखद धक्का
घनश्यामदास नारवाणी यांचा इ-मेल ही आनंदाची बाब आहे. हा सुखद धक्काही आहे. माझी उर्दू पुस्तके सीमेपलीकडे त्यांनी कशी मिळवली कोणास ठावूक? हरकत नाही. थोरांची माहिती सीमेपलिकडे पोहोचते आहे. कामाचे चीज झाले. त्यांचे आभार जास्तीत जास्त लोकांपर्यंत शिवाजी, फुले, शाहू व आंबेडकर पोहोचवण्याची विनंती त्यांना पाठवलेल्या उत्तरातील इ-मेलमध्ये केली आहे.’’
अँड. एस. एस. गाझियोद्दिन, लेखक