आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तळपतो तप्त हिंदवी बाणा..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘महाराजांची कीर्ती बेभान, भल्याभल्यांना फुटला घाम’, ‘वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा’, ‘कशी चिटकली घोरपडं, वर एकेक चडं’ ‘भगवे आमचे रक्त, तळपतो तप्त हिंदवी बाणा’ या व अशाच कित्येक पहाडी आवाजातील गाणी, पोवाडे, भगवे ध्वज, कर्णकर्कश आवाजातील डॉल्बीच्या आवाजाने मागील दोन-चार दिवसांपासून शहर शिवमय झाल्याचे चित्र आहे.

स्पर्धा व व्याख्याने
यंदाची शिवजयंती थोडी जास्तच उत्साहाने भरलेली होती. यामुळे शहराच्या विविध भागांत शिवचरित्रावर व्याख्याने आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी गड, कोट व किल्ले यांची सचित्र प्रदर्शने आणि माहितीपर चित्रांचे सादरीकरण झाले.

भगवा मधला मारुती
शहराची मुख्य बाजारपेठ असणार्‍या मधला मारुती परिसराला तर पूर्ण भगवा साज चढला होता. भगव्या पताका, शेले, झेंडे तसेच मिरवणुकीत उडविण्यात येणार्‍या शंख, ए-वन व 999 क्रमांकाच्या विक्रीच्या अरगजाच्या पोत्यांनी रस्ते व्यापले होते.

टेलर बांधवांची दिवाळी
शेवटच्यादिवशी काढण्यात येणार्‍या मिरवणुकीत मंडळांचा पोषाख एकसारखा दिसावा यासाठी मंडळांचे प्रयत्न दिसले. एरवी दिवाळीत टेलरबांधवांवर लोड असतो. परंतु या वेळी एकच शिवजयंती असल्याने काही मंडळांना तर टेलरही मिळाला नाही. त्यांनी रेडिमेडला पसंती दिली.

निर्णयाचे स्वागत
या वेळच्या शिवजयंतीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे सर्व पक्ष आणि संघटनांनी 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती करण्याच्या निर्णयास पाठिंबा देत त्याचा स्वीकारही केला. त्यामुळे अनेक वर्षांपासून सार्ज‍या होणार्‍या शिवजयंत्या आणि आताची यात फरक पडला. रस्ते मंडपांनी व्यापले. तरुणाई विशेष उत्साह होती.

डेसीबलची र्मयादा ओलांडणारे डॉल्बी
बहुतेक शिवजयंती मंडळात शिवरायांचे कार्य, जीवनपट दर्शविणारी गाणी सर्वत्र वाजत होती. डेसिबलची र्मयादा कोणी पाळलीच नाही.

आकर्षक मूर्ती
पूर्वी केवळ सिंहासनाधीश मूर्ती हा एकच प्रकार होता. अश्वारुढ, तलवार उपसलेली आणि वैविध्यपूर्ण रंग तसेच अलंकारांनी मढवलेल्या मूर्ती असे प्रकार उपलब्ध होते. शिवाय काही सेवाभावी संस्थांनी मूर्ती व प्रतिमा भेट दिल्या.

सजावटीत चुरस
मंडपांच्या आकार व प्रकारात विभिन्नता आहे. किल्ला, प्रवेशव्दार, कमानी आकाराचे मंडप होते. तसेच झगमगाटाची विद्युत रोषणाई, शिवबांची छबी असलेले ध्वज, छोटे झेंडे आणि रंगीबेरंगी फुलांच्या वेलींची डिझाइन हे वैशिष्ट्य ठरले.

डिजिटल सोलापूर
डिजिटल लावून प्रसिद्धी करणे नेहमीच आहे. परंतु या शिवजयंतीला राजांच्या निरनिराळ्या छबी, खेचक वाक्ये, भव्य आकाराचे डिजिटल हे वेगळेपण होते. कोणताही रस्ता घ्या, त्यावर किमान एक स्वागत कमान आणि चार-पाच तर डिजिटल फलक होतेच.

छायाचित्र - चार पुतळा परिसरात शिवप्रकाश प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांचा आकर्षक देखावा उभा केला आहे. येथील विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.