आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिवपुत्र शंभूराजे’ महानाट्याद्वारे इतिहासाचे सिंहावलोकन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ‘तोफेने केली गर्जना सिंह गर्जता तुतारी देतेय ललकारी, जागा सह्याद्री जागली दुनिया ही सारी.’ अशा पोवाड्यांद्वारे शिवपुत्राच्या शौर्याचा गौरव, धर्मावरील आक्रमण परतावून लावत हिंदवी स्वराज्य व सह्याद्रीच्या अंगावरील गडकिल्ल्यांना कुणालाही हात लावू न देण्याची छत्रपती शंभूराजेंनी घेतलेली प्रतिज्ञा अन् घरभेद्यांसह मोगलांच्या विरोधात समशेर (तलवार) चालविणार्‍या रयतेच्या राजाच्या पराक्रमाचे सोलापूरकर साक्षीदार झाले.

लोकमंगल प्रतिष्ठान प्रस्तुत शिवस्वराज्य प्रतिष्ठान (पुणे) निर्मित ‘शिवपुत्र शंभूराजे’ महानाट्य सादर होत आहे. पंचसूत्रीद्वारे दिलेल्या जबाबदारीच्या जाणिवेने आदर्श राजा अन् वडिलाचे दर्शन रसिकांना झाले. कलाकारांचे संवाद, पार्श्वसंगीत, पोवाडे प्रेक्षकांना भावणारे होते.

दुर्ग स्टॉलवर गर्दी
दुर्ग संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या महासंघाच्या स्टॉलवर श्रमदानास नावनोंदणीसाठी दुर्गप्रेमींनी मोठी गर्दी केली. महानाट्याच्या आवारात दुर्ग महासंघाचा स्टॉल आहे. शिवाजी ट्रेल व महासंघातर्फे सोलापूर जिल्ह्यातील दुर्गांचे संवर्धन होणार आहे. त्यासाठी नावनोंदणी व मदत निधीसाठी दुर्गप्रेमी पुढे सरसावले आहेत. शंभूराजेंची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे हे शिवाजी ट्रेलचे ब्रँड अँम्बेसेडर आहेत.