आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: भव्य शिवराज्याभिषेक सोहळा राजगडावर जल्लोषात साजरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाड (जिल्हा रायगड)- छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी जय शिवाजी... जय जय जय जय जय शिवाजी... या आसमंताला छेदणाऱ्या घोषणांच्या निनादात भव्य शिवराज्यभिषेक सोहळा आज (6 जून) तारखेनुसार राजगडावर साजरा करण्यात आला. यावेळी लाखो शिवभक्त हातात भगवे घेऊन उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरातील शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत.
पहाटे 5.30 वाजता ध्वजारोहणाने सोहळ्याला सुरवात झाली. त्यानंतर मुख्य राज्यभिषेक सोहळा झाला. युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या मुर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर जगदिश्वर मंदिराकडे भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. शिवधनुष्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शिवनेरीहून पालखी आणली होती.
रायगडावर झालेल्या शिवराज्यभिषेक सोहळ्याचे फोटो बघा पुढील स्लाईडवर....