आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराय जाती-धर्मापलीकडे, डॉ. शिवरत्न शेटे यांनी उलगडले शिवचरित्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज जाती- धर्मापलीकडील होते. हिंदवी स्वराज्याची निर्मिती हेच त्यांचे अंतिम ध्येय होते. त्यासाठीच त्यांनी लढाया केल्या. अशाच पद्धतीचे समाजकारण आणि राजकारण करण्याचे काम (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनी केले. शिवरायांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही; परंतु दोघांमध्ये काही गोष्टींबाबत साम्य असल्याचे डॉ. शिवरत्न शेटे यांनी सांगितले.

ठाकरे यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त त्यांचे व्याख्यान झाले. ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यातील साम्य’ हा विषय होता. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील होते. शहरप्रमुख प्रताप चव्हाण, जिल्हा महिला संघटक अस्मिता गायकवाड, शांताबाई जाधव, माजी आमदार शिवशरण पाटील, नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे, कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी आदी मंचावर होते. उपशहर प्रमुख व्यंकटेश नंदाल यांनी स्वागत केले. विभागप्रमुख अनिल कोंडूर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विकी साळुंके, कृष्णा मंजुळकर, व्यंकटेश तवटम, काशीनाथ कोटा, संजय अडगुळे, संजय गुंड, इब्राहिम पीरजादे, जयप्रकाश काटे आदींनी पर्शिम घेतले.