आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ते शिंदीखाने नव्हे कत्तलखाने; शिवसेना रस्त्यावर येऊन विरोध करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरात शिंदीखाने नसून, माणसांचे कत्तलखाने आहेत, असा आरोप करून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी नव्याने येणार्‍या शिंदीखान्यास विरोध करणार असल्याचे सांगितले. शहरात सात शिंदीखाने आहेत. त्यातून विषारी ताडीची विक्री होते. ते प्यायल्याने अनेक कामगारांचा मृत्यू झालेला आहे. या वस्तुस्थितीकडे दुर्लक्षून आणखी एका शिंदीखान्याची भर घालणे म्हणजे गरिबांच्या जीवाशी खेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहर आणि जिल्ह्यात ताडीची बने आहेत कुठे? असली तरी त्यातून मिळणारी ताडी किती? शहरात हजारो बाटल्या ताडी येते कुठून? याचा विचार शासकीय यंत्रणेने कधीच केलेला नाही. ताडी दुकाने चालवणारे कंत्राटदार रासायनिक ताडी विकतात. त्यामुळे कामगारांचे जीव जातात. ताडी प्यायची सवय असलेल्यांची स्थिती पाहावत नाही. अनेक तरुण मुलांना ताडी पिण्याचे व्यसन असल्याने कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. ही विदारक स्थिती डोळ्यासमोर असताना, केवळ महसूलसाठी आणखी एक शिंदीखाना आणणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न र्शी. ठोंगे-पाटील यांनी केला. नव्या शिंदीखान्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देणार असल्याचेही सांगितले.
शिवसेनेच्या मागण्या
>नव्या ताडी दुकानाचा लिलाव रद्द करा
>शिंदीखान्यातील ताडीची तपासणी करा
>नैसर्गिक ताडीच्या तुलनेत दुकाने ठेवा
>विषारी ताडी विकणार्‍यांवर गुन्हे नोंदवा