आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shivsharan Mali Is New University Rejistrar Of Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅड. शिवशरण माळी नूतन कुलसचिव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या नूतन कुलसचिवपदी अ‍ॅड. शिवशरण माळी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती, कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी दिली. अ‍ॅड. माळी नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारपर्यंत ते रूजू होण्याची शक्यता आहे. कॅ. डॉ. नितीन सोनजे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद 5 एप्रिलपासून रिक्त होते. विद्यापीठात रविवारी दुपारी मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव दिनेश कांबळे व अँड. माळी या दोघांच्या मुलाखती झाल्या.

अ‍ॅड. माळी यांचा परिचय
नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात 2002पासून उपकुलसचिव आहेत. साहाय्यक कुलसचिव म्हणून 1997 मध्ये ते रूजू झाले. त्यांनी परीक्षा नियंत्रक म्हणूनही तेथे कामकाज पाहिले आहे. येळी (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथे जन्मलेल्या अ‍ॅड. माळी यांचे शिक्षण सिम्बॉयसीसमधून (पुणे) कायद्याच्या पदवीचे, तर पुणे विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. त्यांनी सोलापुरातील जाम मिलमध्ये 12 वष्रे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहिलेले आहे.

काम करण्यास उत्सुक
सोलापूरकरांनी दिलेली संधी स्वीकारली असून सोलापूर विद्यापीठात काम करण्यासाठी उत्सुक आहे. येत्या तीन ते चार दिवसांत रूजू होणार आहे.’’ अ‍ॅड. शिवशरण माळी, नूतन कुलसचिव