आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रेड्डी, डॉ. अंधारे यांना शिवतीर्थ पुरस्कार जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूरच्या वैभवात भर घालण्यासाठी ‘बालाजी सरोवर प्रीमियर’ या पंचतारांकित हॉटेलची उभारणी करणारे राम रेड्डी, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयातील डॉ. विजय अंधारे, जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षा संगीता फाटे, योग अभ्यासाच्या प्रचारक सुधा अळ्ळीमोरे, पत्रकार राजा माने आणि संभाजी आरमारचे अध्यक्ष र्शीकांत डांगे यांना शिवतीर्थ पुरस्कार जाहीर झाले.

मराठा समाजसेवा मंडळाच्या वतीने रविवारी (ता. 13) दसरा महोत्सव (सीमोल्लंघन) आयोजिला आहे. तीत या पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी दिली. सरस्वती चौकातील छत्रपती शिवाजी प्रशालेच्या राजर्षी शाहू सभागृहात सकाळी नऊला हा कार्यक्रम होईल. राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते होणार्‍या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी र्शी. सपाटे असणार आहेत. याच कार्यक्रमात ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यवाह डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचे ‘विचारांचे सीमोल्लंघन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. संस्थेचे सभासद, शिक्षक, पालक, समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव प्रा. महेश माने यांनी केले.