आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivtirth Award Felicitation Programme At Solapur

सद्विचार आणि सद्गुणांतूनच विचारांचे सीमोल्लंघन शक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- प्रत्येकाने आपल्या कर्तृत्वाने मोठे व्हावे आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर समाज घडवण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन दुग्धविकास व मत्स्य व्यवसायमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.

मराठा समाजसेवा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी प्रशालेत रविवारी आयोजित दसरा महोत्सवानिमित्त सीमोल्लंघन आणि शिवतीर्थ पुरस्कारांचे वितरण झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मनोहर सपाटे होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून स्वर्णलता भिशीकर यांची उपस्थिती होती. दुग्धविकास मंत्री चव्हाण म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने समाजासाठी काही वेळ दिला पाहिजे. यातून समाजासाठी आपण काहीतरी उपयोगी पडतोय याचे समाधान आपल्याला मिळते. समाजकार्यासह तरुणाईतील व्यसनाधीनता दूर करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. सारिका महामुनी यांनी सूत्रसंचालन केले. हणमंतू शेळके यांनी आभार मानले.

यांचा झाला गौरव
मार्कंडेय रुग्णालयाचे डॉ. विजय अंधारे (वैद्यकीय), बालाजी अमाईन्स व पंचतारांकित सरोवर हॉटेलचे राम रेड्डी (उद्योग), पत्रकार राजा माने (साहित्य), पतंजली योग समितीच्या सुधा अळ्ळीमोरे (योग सेवा), जिल्हा बँक्स असोसिएशनच्या संगीता फाटे (बँकिंग), संभाजी आरमारचे र्शीकांत डांगे (समाजसेवा).

मी, माझे सोडा : भिशीकर
दसरा महोत्सव आणि शिवतीर्थ पुरस्कार वितरण कार्यक्रमात वक्त्या स्वर्णलता भिशीकर यांनी ‘विचारांचे सीमोल्लंघन’ या विषयांवर मार्गदर्शन केले. विचारांचे सीमोल्लंघन करायचे असेल तर मी, माझे असा विचार करणे सर्वप्रथम सोडले पाहिजे. तसेच, पर्यायाने आपल्याला समाजासाठी काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. सद्विचार आणि सद्गुणांचा गुणाकार करणे म्हणजेच विचारांचे सीमोल्लंघन होय. आचारांचेही सीमोल्लंघन करा, असेही त्या म्हणाल्या.