आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shortage Hybrid Seeds Issue At Solapur, Divya Marathi

यंदा संकरित बियाण्यांची भासणार भीषण टंचाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीनसह इतर पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे यंदाच्या वर्षी पेरणीसाठी दज्रेदार बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. संकरित बियाण्यांची टंचाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बोगस बियाणांवर आळा घालण्याचे मोठे आव्हान कृषी विभागापुढे आहे.

खरीप हंगामाच्या दृष्टीने कृषी विभागातर्फे तयारी सुरू झाली. यंदा अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता गृहीत धरून कृषी विभागातर्फे खतं, बियाणांचे नियोजन करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्के कमी रासायनिक खतांचा पुरवठा आला आहे. पण तुटवडा निर्माण होणार नसल्याचा दावा कृषी विभागातर्फे करण्यात आला.

गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी व रब्बीमध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून बाहेर पडण्यासाटी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खरिपाच्या आशेवर शेतीच्या मशागतीची तयारी सुरू केली. जिल्ह्यात सूर्यफूल, मूग, मटकी, तुर ही प्रमुख पिकं घेण्यात येतात. तसेच, संकरित ज्वारी, मका, पिकं घेण्यात येतात. शेतकरी आधीच अडचणीत असल्याने त्यांची बोगस बियाणे व खतांची चढय़ा दराने विक्रीमुळे अधिक फसवणूक होऊ नये, याचे मोठे आव्हान कृषी विभागापुढे आहे.
शासनाकडून दोन लाख 41 हजार टन खत पुरवठा
यंदा शासनाकडे 3 लाख 75 हजार टन रासायनिक खतांची मागणी कृषी विभागाने केली होती. परंतु फक्त 2 लाख 41 हजार टन खताचा पुरवठा झाला. गेल्यावर्षी 2 लाख 89 हजार टन खताचा पुरवठा होता. यंदाच्यावर्षी 20 टक्के खताचा पुरवठा कमी झाला आहे. गेल्यावर्षीचे 45 हजार टन खत शिल्लक आहे. 5 मे पर्यंत शासनाकडून 28 हजार टन खताचा पुरवठा झाला आहे.
संकरित बियाणे मंजूर कोटा (आकडेवारी क्विंटलमध्ये)
संकरित ज्वारी 24
बाजरी 294
सूर्यफूल 700
सुधारित बाजरी 800
तूर 2,700
सोयाबीन 7,900