आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराचे २८ एमएलडी पाणी जाते तरी कोणाच्या घशात?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पाकणी टाकळी येथील पंप हाउसमधून सोलापूर शहराकरता सध्या १३५ एमएलडी पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यापैकी शासन निकषानुसार २० टक्के गळती ग्राह्य धरली तर किमान १०६ एमएलडी पाणी नागरिकांना वितरण होणे अपेक्षित आहे. पालिका अधिकारी शहरात सध्या ८० एमएलडी पाणी वितरण केले जात असल्याचे सांगतात. याचाच अर्थ ५५ एमएलडी इतक्या पाण्याचा हिशोब लागत नाही. गळतीचे २७ एमएलडी पाणी वजा केले तर आणखी २८ एमएलडी पाण्यामधून कोणाच्या घशाची कोरड भागवली जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात दररोज ८० एमएलडी पाणी शहरवासियांना नळ पाणी पुरवठा योजनांमधून वितरण केला जात असल्याचे पालिका पाणी पुरवठा विभागच सांगतो. यामुळे ५५ एमएलडी पाणी दररोज मुरते कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनधिकृत नळ कनेक्शनची शोध मोहीम राबवणे गरजेचे आहे. ही मोहीम प्रामाणिकपणे राबवल्यास पाण्याचा हिशेब लागेल.
मिळकती नळ कनेक्शन संख्येत तफावत
२.१५ हजारशहरात मिळकती
९५ हजारनळकनेक्शन केवळ
उपसातून ६०%च पाणी हाताशी
उजनीयेथून ६५ ते ७० एमएलडी पाण्याचा उपसा होतो. टाकळी येथून ७० ते ७५ एमएलडी पाण्याचा उपसा होतो. एकूण १३५ ते १४५ एमएलडी दररोज उपलब्ध होते. हिप्परगा येथून १० ते १२ एमएलडी पाणी मिळते. सध्या तलावात पाणी नाही त्यामुळे उपसा बंद आहे. सध्या १३५ एमएलडी पाणी मिळत असले तरी तीन दिवसांआड म्हणजे एका भागाला एक दिवस पाणी पुरवले जाते. साधारण ८० एमएलडी दररोज वितरण होते. गळती २७ एमएलडी वजा केली तरी २८ एमएलडीचा हिशेब लागत नाही.
आरोग्यावर होतो परिणाम
तीन दिवसांचे पाणी लोकांना साठवून ठेवावे लागते. पाणी साठवणुकीचा कालावधी अधिक असल्याने पाण्यातील औषधांची मात्रा अपसूकच कमी होते. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. पूर्वी किमान एक तास पाणी नळाला सोडण्यात येत. सध्या दोन-अडीच तास पाणी पुरवले जाते. त्यामुळे सामान्य नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येते.
गळती रोखण्याची गरज
शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनी धरणातून १३५ एमएलडी पाणी उचल होत असले तरी प्रत्यक्षात वितरणासाठी ८० एमएलडी पाणी आपल्याला मिळते. नागरिकांनी पाणी चोरी करू नये, पाण्याचा अपव्यय टाळावा. सार्वजनिक नळांमधून वाया जाणाऱ्या पाण्याची गळती टाळण्यासाठी तोट्या आवश्यक. तरच सर्वांना मुबलक पाणी मिळेल.
सिध्देश्वर उस्तुरगे, उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग
माणसी लागते पाणी
पिण्यासाठी : लिटर
स्वयंपाक : लि.
स्नान : २० लि.
स्वच्छतागृह : ४० लि.
कपडे धुणे : २५ लि.
भांडी धुणे : २० लि.
गार्डन : २३ लि.
एकूण : १३५ लि.
आधी दिवसांतून दोनदा, आता तीन दिवसांआड
तीन दिवसांआड पाणी पुरवठा
वर्ष २०११
लाख ५१ हजार
१३५ एमएलडी
एक दिवसाआड पाणी पुरवठा
वर्ष २००१
लाख ७3 हजार
१०८ एमएलडी

दिवसातून दोनदा पाणी पुरवठा
वर्ष १९९१
लाख ०४ हजार
८१ एमएलडी
बातम्या आणखी आहेत...