आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात सुमारे 500 महिलांनी घातली 68 लिंगांना प्रदक्षिणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पायी चालत व मुखी सिद्धेश्वरांचे नाम जपत सोलापूरच्या वीरशैव महिला मंडळाच्या 501 महिलांनी 68 लिंगांना भक्तिभावाने प्रदक्षिणा घातली. ‘एकदा भक्तलिंग हर बोला हर’च्या जयघोषात महिलांनी पहाटे सहा वाजता सिद्धेश्वर मंदिरातून या प्रदक्षिणेस सुरुवात केली होती.

ओठी परमेश्वरांचे नाम आणि पायी चालणे याने भक्तिमय वातावरणात ही प्रदक्षिणा सुरू झाली होती. या वेळी प्रत्येक मंदिरात महिलांचे भक्तिगीत व नाम जप चालू होता. स्वामी सावळगी त्या ठिकाणचे महत्त्व सांगत. या प्रदक्षिणेस पहाटे सहा वाजता सुरुवात झाली. दुपारी दोन वाजता बाळीवेसमधील मल्लिकार्जुन मंदिरात विश्राम देण्यात आला. या वेळी मन्मथेश्वर मंदिरात महिलांना वीरशैव युवक संघटनेच्या वतीने प्रसाद देण्यात आला.

भक्तांच्या प्रतिक्रिया
श्रावणात ईश्वरचरणी एक दिवस दिला तर त्याचा आनंद मला समाधानाच्या रूपाने मिळते. त्यांच्या सेवेने मन भरून येते. दिवसभर चालूनही आणखी चालावेसे वाटते.
- नीलम साळुंके

सिद्धरामेश्वरांच्या भक्तीत अनोखी शक्ती आहे. त्याच्या या सेवेने भक्तांना आपल्या वर्षभराच्या सेवेचे समाधान मिळते. मी गेले अनेक वर्षे ही प्रदक्षिणा पूर्ण करते. आनंद अन् भक्तीचा अनोखा संगम या सेवेत आहे.
- सुजाता रणदिवे

भक्तीपोटी काहीही
अक्कलकोट, कुंभारी, विजापूर, दहिटणे, बोरामणी, वळंसग, कर्दनहळ्ळी, तोगराळी या गावांतूनही आल्या होत्या. जप करत त्यांनी दुपारी दोन वाजता प्रदक्षिणा संपवली. तोपर्यंत पाण्याशिवाय इतर काहीही सेवन केले नाही.

असा होता मार्ग
सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरातून पहाटे सहा वाजता निघालेल्या या प्रदक्षिणेचा मार्ग महापौर बंगला, पांजरापोळ, चंडक बगीचा, शिवानुभव मंगल कार्यालय, मधला मारुती मंदिर, खारी बावडी, नंदीमठ वाडा, पंचकट्टा, काँग्रेस भवन, गुरू भेट, पार्क मैदान, बाबा कादरी मशीद, कालिका मंदिर व शेवटी मल्लिकार्जुन मंदिर अशी प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली.

स्वयंसेवकांचे संरक्षण
501 महिलांच्या या समूहाला वीरशैव युवक संघटनेच्या युवकांनी संरक्षण देत त्यांच्या या अध्र्या दिवसांच्या प्रदक्षिणेस मदत केली. महिलांना पाणी देणे, थकलेल्या, वृद्ध महिलांना आधार देणे असे कार्य या तरुणांनी केले.