आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shravan: Sun Rise To Sun Set Mahamritunjay Yadyan Continue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रावण: सूर्योदय ते सूर्यास्त महामृत्यूंजय जपाचे सोलापूरात आयोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पहिल्या श्रावण सोमवारी विविध ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम झाले. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात भाविकांचा दिवसभर जणू दर्शन रांगेचा मेळा रंगला होता. रात्री उत्साहात पालखी सोहळा झाला. नंदीध्वजाचे मानकरी हिरेहब्बू यांच्या निवासस्थानी मंगळागौरी पूजन तर क्षत्रिय समाजाकडून सूर्योदय ते सूर्यास्त महामृत्यूंजय जप करण्यात आला.

दुपारी 12 वाजता बाळीवेस परिसरातील राजशेखर हिरेहब्बू यांच्या निवासस्थानात मंगळागौरीची विधिवत पूजा करण्यात आली.ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात पहिल्या र्शावण सोमवारी सकाळी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव डॉ. किरण यांच्या हस्ते तांदूळ पूजा करण्यात आली, तर फुलांच्या मेघडंबरीची सेवा सिद्धाराम चिट्टे यांनी केली होती. दिवसभर अनेक भाविकांनी श्रींचे मोठय़ा भक्तिभावात दर्शन घेतले. पोलिसांचा चोख बंदोबस्त तसेच स्त्री-पुरुषांच्या स्वतंत्र रांगा यामुळे विनाव्यत्यय दर्शनरांगा सुरू होत्या. दिवसभर रूद्रपूजा, महाभिषेक, बिल्वार्चन, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


पालखीला चांदीचा मुलामा
रात्री 10 वाजता काढण्यात आलेल्या श्रीसिद्धेश्वरांच्या पालखी मिरवणुकीत आनंद हब्बू, आकाश हब्बू, शुभम हब्बू, सिद्धय्यास्वामी हिरेमठ सहभागी झाले होते. या लाकडी पालखीचे वजन 150 किलोच्या आसपास असून त्यावर 2002 साली 23 किलो चांदीचा मुलामा केला आहे. र्शावणात दररोज रात्री 9 वाजता पालखी सोहळा होतो. पुरातन काळापासून ही परंपरा आहे. प्रत्येक सोमवारी रात्री 10 ला पालखी निघते. एरवी वर्षातील साडेतीन मुहूर्त आणि दर सोमवारी ही पालखी सेवा होत असल्याची माहिती पुजारी आनंद हब्बू यांनी दिली.


11 किलो तुपाचा वापर
314 वर्षांचा इतिहास असणार्‍या सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाच्या क्षत्रिय गल्ली येथील श्री विठ्ठल मंदिरात सोमवारी षष्ठीदिवशी सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत महामृत्यूंजय मंत्राचा अखंडपणे जप करण्यात आला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळपास 582 जणांनी यजमान होऊन आहुत्या दिल्या. सकाळी 6.10 ते सायंकाळी 6.35 यावेळेत हा धार्मिक विधी झाला. प्रतिवर्षी र्शावणषष्ठीदिवशी हा अखंडहोम होत असल्याचे समाजाचे गणपतसा कोल्हापुरे व अंबाराम मिरजकर यांनी सांगितले. 12 तास अखंडपणे झालेल्या या विधीत 11 किलो तुपाचा वापर करण्यात आला.

श्रीयाळ शेठची प्रतिष्ठापना
गवंडी गल्ली परिसरात श्रीयाळ शेठची प्रतिष्ठापना सोमवारी करण्यात आली. राजा श्रीयाळ शेठ यांचा प्रतीकात्मक मातीचा पुतळा बनवण्यात आला. नंतर या पुतळय़ाचे पूजन करण्यात आले. पंचमीदिवशी पूजेतून आणलेला हळदीचा दोरा या वेळी अर्पण करण्याची प्रथा आहे. गवंडी गल्ली, लष्कर आणि वडारगल्ली आदी भागांत आजही असे पुतळे बनवण्यात येतात. तसेच रात्री 12 च्या सुमाराला पुन्हा पूजा विसर्जन करण्याची पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे.

हिरेहब्बू यांच्या निवासस्थानी भाविकांना महाप्रसाद
हिरेहब्बू यांच्या निवासस्थानी सकाळी प्रतिष्ठापना, पूजन झाल्यावर उपस्थितांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिरेहब्बू कुटुंबातील संध्या, सुमन, प्रतिभा, स्वाती या महिला तर शिवानंद हिरेहब्बू, प्रभावती मसरे, महादेवी म्हमाणे, सोनाली बाभूळगावकर यांनी पूजा केली. आमदार विजयकुमार देशमुख, पोलिस दलातील खुशालचंद बाहेती, नितीन कौसडीकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.