आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीशैल मल्लय्या येताहेत भक्तांच्या भेटीला; सोलापुरात रथयात्रा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सुमारे 900 वर्षांपूर्वी सोलापूरचे ग्रामदैवत श्रीसिद्धरामेश्वर यांची गुरूश्री मल्लिकार्जुन यांच्यासोबत झालेली गुरुभेट सर्वर्शुत आहेच. परंतु, सध्या या भेटीची पुनरावृत्ती होत आहे. यावेळेस स्वत: गुरू भक्तांच्या भेटीला येत आहे. आंध्र प्रदेश सरकारने पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून आखलेल्या श्रीमल्लिकार्जुन आणि माता भ्रमरांबिका यांचा श्रीशैलम (आंध्र प्रदेश) येथून निघालेला विश्वकल्याण रथोत्सव 26 जून रोजी सोलापुरात येत आहे.

हा आहे इतिहास : सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर हे लहान असताना त्यांना सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणार्‍या ठिकाणी गुरू मल्लय्यांचा दृष्टांत व भेट झाली होती. म्हणून या भेट झालेल्या परिसरास श्रीगुरुभेट असे संबोधले जाते. त्या पश्चात सुमारे 900 वर्षांपूर्वी सिद्धाराम गुरूंची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी श्रीशैल येथे गेले होते. श्रीशैलम हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक आहे.

असे आहे प्रयोजन : श्रीमल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्टच्या वतीने निघालेला विश्वकल्याण रथ 26 फूट लांब व 16 फूट उंच आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता जोडबसवण्णा चौकात रथाचे आगमन होत असून येथूनच भव्य मिरवणुकीस प्रारंभ होत आहे. या रथात श्रीशैलच्या श्रीमल्लिकार्जुन, माता भ्रमरांबिका व श्रीगणेश यांच्या मंदिराची प्रतिकात्मक देवळे आहेत. तसेच केवळ जानेवारी महिन्यात निघणारे सातही नंदीध्वज पहिल्यांदाच यात सहभागी होणार असून जलकुंभासह सुहासिनीही असणार आहेत. सायंकाळी सात ते नऊ यावेळेत सिद्धेश्वर मंदिरातील सभामंडपात कल्याण महोत्सव अर्थात प्रतिकात्मक विवाहसोहळा होत आहे.

यांची उपस्थिती
डॉ. चन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी (श्रीशैलपीठ), योगीराजेंद्र शिवाचार्य स्वामी, वीरभद्र शिवाचार्य, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, रेणुक शिवाचार्य स्वामी, श्रीकंठ शिवाचार्य स्वामी, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी आदींची उपस्थिती सोलापुरात होणार्‍या कल्याण महोत्सवावेळी असणार आहे.

यांचे परिश्रम , सहकार्य
अनिल सिंदगी, नंदकुमार मुस्तारे, राजशेखर हिरेहब्बू, तम्मा मसरे, विश्वनाथ जोकारे, शिवलिंग माळगे, महेश अंदेली, सिद्धय्यास्वामी हिरेमठ, मल्लिकार्जुन वाकळे, चिदानंद वनारोटे, बाबूराव नष्टे, अँड. एम. एम. राचेटी, अँड. धानय्या चिवरी, काशिनाथ दर्गोपाटील, सोमशंकर देशमुख, सिद्धाराम चाकोते, गुरु म्हेत्रे, पुष्पराज काडादी, आनंद हब्बू, सिद्धेश्वर मुनाळे, असिम सिंदगी, नरेंद्र गंभीरे, अँड. आर. एस. पाटील, बाळासाहेब भोगडे, सिद्धेश्वर बमणी, ए. जी. पाटील आदी.